
बोर्डी येथे जुगारवर ग्रामीण पोलिसांची कारवाईसहा आरोपी,चार मोबाईल,30,24 रुपये जप्त
अकोला जिल्हा प्रतिनिधी देवानंद खिरकर
अकोला जिल्हा पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या आदेशा नुसार जिल्ह्यात प्रहार मोहीम अंतर्गत धडक कारवाया सुरू आहेत.त्याच प्रमाणे उमरा बीटचे जमदार दादाराव लिखार यांना गोपनीय माहिती मिळाल्या वरून अकोट ग्रामीणचे ठाणेदार श्रीधर गुट्टे यांचे मार्गदर्शनाखाली ग्राम बोर्डी येथील आठवडी बाजारात सरकारी दवाखान्याच्या मागे रेट केली असता एका बादशहा नावाचा जुगार खेळताना सहा आरोपींना रंगेहात अटक करण्यात आली असून त्यांच्या जवळून चार मोबाईल,३०२४ रुपये नगदी जप्त करण्यात आले असून आरोपी विरुध्द अकोट ग्रामीण पोलिस ठाण्यात जुगार प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे.सदर कारवाई उमरा बीट जमदार दादाराव लिखार,व त्यांचे कर्मचारी यांनी केली आहे.
