
आंबोडा अकोलखेड मोहाळा मित्रपरिवार यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्यदिन निमित्त एकता दौड मॅरेथॉन स्पर्धा
अकोला जिल्हा प्रतिनिधी देवानंद खीरकर
अकोट तालुक्यातील आंबोडा अकोलखेड मोहाळा मित्रपरिवार यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित एकता दौड मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.ही मॅरेथॉन स्पर्धा मोहाळा फाटा ते रूट मोहाळा ते आंबोडा अशी राहील.या मॅरेथॉन स्पर्धेचे अंतर १६०० मीटर राहणार आहे. या मॅरेथॉन स्पर्धेसाठी खुला गट फक्त मुले प्रवेश शुल्क फक्त शंभर रुपये ठेवण्यात आली आहे. मॅरेथॉन स्पर्धेकरिता प्रथम क्रमांक ७००१ स्व.हितायतजी पटेल, द्वितीय क्रमांक ६००१ राजेश सावरकर नागेश सावरकर, तृतीय क्रमांक ५००१ मनीष कराळे, चतुर्थ क्रमांक ४००१ जगन्नाथ निचळ, पाचवा क्रमांक ३००१ जगदीश शिवरकर, सहावा क्रमांक २००१ कुलदीप वसु, सातवा क्रमांक १५०१ विठ्ठल सावरकर, आठवा क्रमांक १००१ ज्ञानदेव सावरकर, नववा क्रमांक ७०१ प्रमोद

रायबोले, दहावा क्रमांक ५०१ ऋषी तेल्हरकर, यांच्यातर्फे देण्यात येणार आहे. या मॅरेथॉन स्पर्धेच्या नोंदणीसाठी खालील नंबर वर आपले नाव मोबाईल नंबर व आधार कार्ड पाठवावे. सूचना मॅरेथॉन दरम्यान स्पर्धकाला झालेल्या कोणत्याही शारीरिक हानीस पंच जबाबदार राहणार नाही, पंचाचा निर्णय अंतिम राहील,१३ ऑगस्ट नंतर नाव नोंदणी घेतल्या जाणार नाही, सहभागी प्रत्येकास रनिंग साठी लागणारे भेटवस्तू दिली जाणार, मार्गदर्शक आदित्य तळोकार सर, अधिक माहितीसाठी संपर्क 9067490183,9881082650,8767320720
