अमानी रिठद रस्त्याच्या दुरुस्तीसाठी नागरिकांचा इशारा 15 ऑगस्टला जन आंदोलनाचा इशारा

अमानी–रिठद रस्त्याच्या दुरुस्तीसाठी नागरिकांचा इशारा; 15 ऑगस्टला जनआंदोलनाचा इशारा

वाशिम | प्रतिनिधी

अमानी ते रिठद या अत्यंत महत्त्वाच्या मार्गाची तात्काळ दुरुस्ती करून वाहतुकीस योग्य करण्यात यावे, अन्यथा 15 ऑगस्ट 2026 रोजी जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा परिसरातील ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिलेल्या निवेदनातून दिला आहे.निवेदनानुसार, अमानी–रिठद मार्ग हा अनेक गावांना जोडणारा प्रमुख रस्ता असून या मार्गावरून शेतकरी, विद्यार्थी, रुग्ण, व्यापारी तसेच सर्वसामान्य नागरिकांची मोठ्या प्रमाणावर ये-जा असते. मात्र रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच अपघातांची शक्यताही वाढल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.ग्रामस्थांनी यापूर्वीही सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अनेक वेळा रस्ता दुरुस्तीची मागणी केली होती. मात्र अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.निवेदनात रस्त्याची तात्काळ दुरुस्ती, दर्जेदार काम करून वाहतुकीस सुरक्षित बनविणे तसेच दुरुस्तीचे काम त्वरित सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. 15 ऑगस्टपूर्वी सकारात्मक कार्यवाही न झाल्यास जनआंदोलन करण्यात येईल, तसेच आंदोलनादरम्यान उद्भवणाऱ्या कोणत्याही कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नास संबंधित प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार राहील, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी (जिल्हा परिषद), अधीक्षक अभियंता (सार्वजनिक बांधकाम विभाग), उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, पोलीस निरीक्षक तसेच संबंधित ग्रामपंचायतींना देण्यात आल्या आहेत.शंकर वाझुळकर विवेक गवळी भूषण खाडे निलेश चांडे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *