इंडियन मेडिकल असोसिएशनचे वतिने एक दिवसाचा लाक्षणिक संप मागण्या संदर्भात दिले शासनाला निवेदन

इंडियन मेडिकल असोसिएशनचे वतिने एक दिवसाचा लाक्षणिक संप मागण्या संदर्भात दिले शासनाला निवेदन

वाशिम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव)

होमिओपॅथिक पदवीधर डॉक्टरांना ऍलोपॅथीची प्रॅक्टिस करण्याची परवानगी देऊ नये. अशा मागणीचे निवेदन इंडियन मेडिकल असोसिएशन (आय एम ए ) मालेगांव च्या वतीने 5 ऑगस्ट रोजी मा तहसीलदार मालेगांव यांना दिले. तसेच संघटनेच्या वतिने आपापली दवाखाने बंद ठेवून संप पुकारण्यात आला त्यासंदर्भात संघटनेच्या वतीने तहसीलदार यांना एक निवेदन देऊन होमिओपॅथिक पदवीधर डॉक्टरांना ऍलोपॅथीची प्रॅक्टिस करण्याची परवानगी देऊ नये असे मागणी करण्यात आली आहे . निवेदनात पुढे म्हटले आहे की सीसीएमपी अर्थात सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्मासिओलॉजी हा एक वर्षाचा कोर्स पुर्ण केलेल्या बीएचएमएस पदवीधारक होमिओपॅथीच्या डॉक्टरांना ॲलोपॅथीची प्रॅक्टीस करता येईल असा निर्णय शासनाकडुन घेतला जात आहे . त्याला आय एम ए संघटनेचा तिव्र विरोध आहे . हा निर्णय वैद्यकीय शिक्षण व आरोग्य सेवेच्या गुणवत्तेच्या दृष्टीने अत्यंत गंभीर व चिंताजनक आहे . तसेच आम्ही एमबीबीएस, एमडी, एमएस पदवीधारक वैद्यकीय क्षेत्रात दीर्घकालीन कठोर वैद्यकीय शिक्षण प्रशिक्षण व क्लीनिकल अनुभवाच्या आधारे रुग्णसेवा करत आहोत . अशा परिस्थितीत अल्पकालीन अभ्यासक्रमाधारित सीसीएमपी व्यक्तींना स्वतंत्र वैद्यकीय प्रॅक्टिस ची मान्यता देणे हे रुग्णांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य नाही असे आमचे ठाम मत आहे . या पार्श्वभूमीवर इंडियन मेडिकल असोसिएशन मालेगाव शाखेच्या वतीने आपणास विनंती करण्यात येते की सदर शासन निर्णयाचा पुनर्विचार करून तो तातडीने स्थगित करण्यात यावा व वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांशी सल्लामसलत करून पुढील धोरण निश्चित करण्यात यावे . तसेच सीसीएमपी धारकांना स्वतंत्र वैद्यकीय प्रॅक्टिस ची नोंदणी देण्यास आमचा ठाम विरोध आहे. ॲलोपॅथीची वैद्यकीय प्रॅक्टिस ही केवळ एमबीबीएस व त्यापुढील मान्यता प्राप्त पदवीधर पदवीधारकांपूर्ती मर्यादित ठेवावी. रुग्णांच्या सुरक्षिततेसाठी वैद्यकीय सेवेत गुणवत्तेचे व प्रशिक्षणाचे निकष कठोर ठेवण्यात यावे. या विषयावर कोणताही अंतिम निर्णय घेण्यापूर्वी वैद्यकीय संघटनांशी सविस्तर चर्चा करण्यात यावी. अशा मागण्या त्यांनी केल्या आहेत. सदर निवेदन शासनाकडे तातडीने पाठवून आमच्या भूमिकेच्या गांभीर्याने विचार करावा अशी विनंती निवेदनात करण्यात आली आहे . या विषयावर जर पुनर्विचार करण्यात आला नाही तर इंडियन मेडिकल असोसिएशनच्या पुढील निर्देशानुसार आम्हाला लोकशाही मार्गाने आंदोलनात्मक भूमिका घ्यावी लागेल असेही निवेदनात म्हटले आहे . या निवेदनावर डॉ व्ही बी सोनोने अध्यक्ष इंडियन मेडिकल असोसिएशन मालेगाव , डॉ . पुरुषोत्तम देवळे सचिव , डॉ सचिन रघुनाथ चाफे , डॉ विवेक माने, डॉ आर के महाजन, डॉ मोहन चापे, डॉ माणिक धूत, डॉ बी बी जाजू ,डॉ सतीश बाहेती ,आदी डॉक्टरांच्या स्वाक्षऱ्या आहेत . सदर मागण्यांची निवेदन त्यांनी माननीय तहसीलदार मालेगाव यांना सहा ऑगस्ट रोजी दिले आणि त्यांचे दवाखाने पूर्णपणे दिवसभर बंद ठेवून शासनाच्या धोरणाचा निषेध व्यक्त केला .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *