
एकनिष्ठ विचार, एकजुटीची ताकद छत्रपती सेना तिवळीचा भव्य-दिव्य आगमन सोहळा स्पर्धेसाठी नाही, परंपरा जपण्यासाठी ; गोरगरिबांच्या मदतीला धावणारे मंडळ – छत्रपती सेना गणेश मंडळ तिवळी
जिल्हा प्रतिनिधी रिसोड गोपाल भिसडे
मालेगाव / छत्रपतींच्या विचारांना प्रेरणा मानून २०१५ साली स्थापन झालेल्या छत्रपती सेना तिवळी गणेश मंडळाची यशस्वी वाटचाल २०२६ मध्ये ११ व्या वर्षात सुरू आहे. #सेनेचा मोरया च्या जयघोषात यंदाही मंडळाचा भव्य दिव्य आगमन सोहळा अतिशय उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला.‘एकनिष्ठ विचार, एकजुटीची ताकत’ हे ब्रीद घेऊन काम करणारे हे मंडळ गावात केवळ गणेशोत्सवापुरते मर्यादित नाही. गावात स्पर्धा, इर्षा करण्यासाठी नाही, तर आपली परंपरा जपण्यासाठी आमचे मंडळ आहे, हीच या मंडळाची खरी ओळख आहे.
गोरगरीब, गरजू व गावातील कोणाच्याही सुख-दुःखात धावून जाणारी छत्रपती सेना तिवळी हीच या मंडळाची विशेष ओळख बनली आहे. दररोज नवनवीन सामाजिक, सांस्कृतिक आणि जनजागृतीपर उपक्रम राबवून मंडळाने तिवळी गावात एक आगळा-वेगळा आदर्श निर्माण केला आहे.मंडळाच्या या निस्वार्थ कार्याचे आणि शिस्तीचे कौतुक संपूर्ण गावातच नव्हे तर तालुक्यात होत आहे. तरुणाईला एकत्र घेऊन सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या छत्रपती सेना तिवळी गणेश मंडळाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
