अकोट तालुक्यात प्रथमच महिला तंटामुक्ती अध्यक्षपदी,स्नेहा भरणे यांची विक्रमी मतांनी निवड

अकोट तालुक्यात प्रथमच महिला तंटामुक्ती अध्यक्षपदी,स्नेहा भरणे यांची विक्रमी मतांनी निवड

अकोला जिल्हा प्रतिनिधी देवानंद खिरका

अकोट तालुक्यात इतिहासात प्रथमच महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदी एका महिलेची निवड झाली असून ही अभिमानास्पद घटना अकोट तालुक्यातील पुंडा ग्रामपंचायत येथे घडली आहे.१५ सप्टेंबर २६ रोजी ग्रामपंचायत कार्यालय पुंडा येथे अध्यक्ष पदासाठी प्रत्यक्ष चिठ्ठी पद्धतीने गुप्त मतदान घेण्यात आले.एकूण १५५ मतदानापैकी १२ मते अवैध ठरली.या निवडणुकीत मोहन अशोक अतकरे यांनी अर्ज माघे घेतला होता.निवृत्ती दिलीप कुलट यांना २६ मते मिळाली,तर सौ.स्नेहा विशाल भरणे यांनी ११७ मते मिळवत घवघवीत विजय मिळवला.सरपंच सौ.लता शाम वाकोडे,सचिव सुभाष नागे,ग्राम महसूल अधिकारी चव्हाण साहेब,उपसरपंच सुधाकर पुंडकर,पोलीस पाटील रेखा सिरसाट,ग्रा.पं.सदस्य निलेश पुंडकर,ज्योती कुलट,प्रतिभा आढे,रोजगार सेवक सुरेश कडू ,कर्मचारी भास्कर पुंडकर,संजय गीते,गजानन आढे,मंगेश कोथळकर माजी तंटामुक्ती अध्यक्ष ज्ञानेश्वर शालिग्राम कुलट यांच्या उपस्थितीत हा निकाल जाहीर करण्यात आला.महिला भगिनी अध्यक्ष झाल्याने गावातील वादविवाद सामोपचाराने मिटतील आणि खऱ्या अर्थाने तंटामुक्त गावाची संकल्पना साकार होईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *