घरासमोर स्वयंपाक करणाऱ्या विवाहितेला अश्लील हावभाव; पतीला मारहाण व जीवे मारण्याची धमकी, दोघांविरुद्ध गुन्हापळशी सुपो येथील घटना

घरासमोर स्वयंपाक करणाऱ्या विवाहितेला अश्लील हावभाव; पतीला मारहाण व जीवे मारण्याची धमकी, दोघांविरुद्ध गुन्हापळशी सुपो येथील घटना

जळगाव जामोद तालुका प्रतिनिधी सुरेंद्र गवई

जळगाव जामोद पोलिसांत BNS कलमांन्वये गुन्हा दाखलजळगाव जामोद, दि. ६ ऑगस्ट : तालुक्यातील पळशी सुपो येथे घरासमोर स्वयंपाक करत असलेल्या विवाहितेकडे अश्लील हावभाव करून तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकाराचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या तिच्या पतीला शिवीगाळ करत मारहाण व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी दोघांविरुद्ध जळगाव जामोद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी सौ. रविना संघपाल सोनोने (वय २१, व्यवसाय – शेती, रा. पळशी सुपो, ता. जळगाव जामोद) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कायमी गुन्हा क्र. ५०८/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ७९, ११५(२), ३५१(२), ३५२ व ३(५) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.या प्रकरणातील आरोपी संतोष शिवराम भगत व सुपडा शिवराम भगत, दोघेही रा. पळशी सुपो, ता. जळगाव जामोद असे आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ६ ऑगस्ट रोजी सकाळी सुमारे ७.३० वाजता फिर्यादी त्यांच्या घरासमोरील ओसरीवर स्वयंपाक करत असताना आरोपी संतोष भगत हा रस्त्याने जात असताना फिर्यादीकडे अश्लील हावभाव करू लागला. या प्रकारामुळे फिर्यादीला लज्जा वाटल्याने त्यांनी घडलेला प्रकार आपल्या पतीला सांगितला.त्यानंतर फिर्यादीच्या पतीने आरोपीला जाब विचारला असता, आरोपीने त्यांना शिवीगाळ करून धक्काबुक्की व मारहाण केली. तसेच “थांब, आता तुला दाखवतो” अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. यावेळी दुसरा आरोपी सुपडा शिवराम भगत यानेही फिर्यादीच्या पतीला शिवीगाळ केल्याचा आरोप आहे.घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक (सहायक) सचिन बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. फिर्यादीच्या तक्रारीवरून सफौ गजानन सातव यांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोहेकॉ तयब अली सयद करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *