
मंगेश सुपडाजी इंगळे यांनी साकारला घरातील आकर्षक गणपती बाप्पांचा देखावा
नांदुरा तालुका प्रतिनिधी : (संदेश पहुरकर )
गणेशोत्सवाच्या निमित्ताने मंगेश सुपडाजी इंगळे मोतीपुरा नांदुरा यांनी आपल्या घरामध्ये अत्यंत कल्पक, आकर्षक आणि कलात्मक पद्धतीने गणपती बाप्पांचा देखावा साकारला आहे. पारंपरिक भक्तीला आधुनिक कलाकृतीची जोड देत तयार करण्यात आलेला हा देखावा भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे.
या देखाव्यामध्ये मध्यभागी विराजमान असलेली गणपती बाप्पांची सुंदर मूर्ती, सभोवतालची आकर्षक सजावट, विविध प्रकारच्या नैसर्गिक स्वरूपाच्या कलाकृती तसेच प्रकाशयोजनेचा प्रभावी वापर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे देखाव्यामध्ये भगवान शंकराच्या प्रतिकात्मक स्वरूपाची कलाकृती आणि विविध सजावटीच्या माध्यमातून एक वेगळा आध्यात्मिक माहोल निर्माण करण्यात आला आहे.मंगेश सुपडाजी इंगळे यांनी स्वतःच्या कल्पकतेतून आणि मेहनतीतून हा देखावा साकारला असून, घरगुती गणेशोत्सवातही कलात्मकता, सामाजिक संदेश आणि भक्तिभाव यांचा सुंदर संगम साधता येतो, हे या देखाव्यातून दिसून येते.गणेशभक्तांनी या सुंदर देखाव्याला भेट देऊन गणरायाचे दर्शन घ्यावे आणि मंगेश सुपडाजी इंगळे यांच्या कलाकृतीचे कौतुक करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया!” 🙏🌺
