
ओबीसी मंडल यात्रे’चे शहरात स्वागत
वाशीम जिल्हा प्रतिनिधी ( अनिल जाधव)
ओबीसींच्या जातीनिहाय जनगणनेसाठी विदर्भातील अकरा जिल्ह्यातून मंडल यात्रा,सकल ओबीसी महामोर्चाचे मुख्य संयोजक उमेश कोराम व नेते विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात शेकडो ओबीसी विचार प्रेरित कार्यकर्त्यासह मंडल यात्रा रथ मालेगाव येथील अकोला मेहकर फाटा, सावित्रीबाई फुले चौकामध्ये शहरातील शेकडो माळी तथा ओबीसी विचारांच्या कार्यकर्त्याकडून भव्य फटाक्यांच्या आतिषबाजीत, पुष्पगुच्छ पुष्पहार देऊन स्वागत करण्यात आले. त्यामध्ये प्रामुख्याने माजी नगराध्यक्ष अरुण बळी, बँक मॅनेजर दिलीप राऊत,अंबिका पतसंस्थेचे मॅनेजर कैलास चोपडे,विद्यमान नगरसेवक योगेश रामचंद्र बळी, युवा सेना शहर प्रमुख विकास सुभाष बळी, शिवसेना शहर प्रमुख संतोष बळी(सावकार), बांधकाम सभापती पुत्र अक्षय संजय बळी, अक्षय वसंत बळी,फौजी गणेश भांदुर्गे, ढवळेश्वर फाउंडेशनचे रुपेश गणेश बळी,विजय प्रल्हाद बळी,लखन बळी, स्वानंद बळी, सागर बळी, केशव उर्फ बंडूभाऊ बळी,भगवान बळी,अनिल बाविस्कर,नंदू बळी (वाहक), केशवराव दत्तूजी बळी, बबन तांबेकर गुरुजी, काशिनाथ जागृत यांच्यासह अनेक मान्यवरांनी मंडल यात्रा मुख्य संयोजक उमेश कोराम व सोबतच्या इतर मान्यवरांचा पुष्पहार देऊन व साप्ताहिक फुले विचार च्या मुख्य संपादिका प्रा.सविता अनिल बळी यांच्या हस्ते कुंकवाचा तिलक लावून सन्मान स्वागत करण्यात आले. याप्रसंगी मुख्य संयोजक उमेश कोराम यांनी मंडल यात्रा इतर मागासवर्गीय (OBC, VJNT, SBC) समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी आणि स्वतंत्र ‘जातीनिहाय जनगणने’च्या (Caste Census) मुख्य मागणीसाठी निघालेली आहे. ओबीसी ची जातीनिहाय जनगणना का ? या प्रश्नाचे समर्पक उत्तर उपस्थित त्यांना देऊन केंद्र व राज्य सरकारकडे सकल ओबीसी महामोर्चांच्या मागण्या काय आहेत हेही त्यांनी विशद केले आहे. जनगणना झाली तर शासनाकडे अधिकृत डेटा असेल यामुळे भविष्यात अडचण येणार नाही,ओबीसी साठी लावलेली क्रिमिलियरची अट रद्द होईल, पदोन्नती आरक्षण मिळेल, केंद्रीय अर्थसंकल्पात दरवर्षी ओबीसींच्या कल्याणासाठी सद्यस्थितीत फक्त एक टक्का निधी देत आहे जो 50 हजार करोड रुपयांची तरतूद करायला पाहिजे, जनगणना झाली तर एससी एसटी प्रमाणे 100% शिष्यवृत्ती मिळेल, पॉलिटिकल आरक्षण,ओबीसींची खरी लोकसंख्या करण्याची हीच वेळ इत्यादी विषयावर सखोल मार्गदर्शन केले प्रस्तुत सकल ओबीसी महामोर्चाच्या मंडल यात्रा काढण्या मागचा हेतू जनगणना कॉलम मध्ये ओबीसी स्वतंत्र कॉलम द्यावा, स्वतंत्र मंत्रालय निर्माण करावे, महा ज्योती संस्थेला एक हजार कोटीचा निधी द्यावा, जिल्ह्यात स्वतंत्र महात्मा फुले ओबीसी भवन उभारण्यात यावे, घरकुल चे आर्थिक सहाय्यक पाच लाख करावे, विद्यार्थ्यांना शंभर टक्के शिष्यवृत्ती लागू करावी, नोकरीच्या एक लाख पदाचा बॅकलाग तात्काळ भरावा, ओबीसी विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक तालुक्याला एक असे 720 स्वतंत्र वस्तीगृह सुरू करावी, 500 ओबीसी विद्यार्थ्यांना परदेशी शिष्यवृत्ती मंजूर करावी, शेतकऱ्यांना स्वामीनाथन आयोग लागू करून आम्ही भाव देण्यात यावा इत्यादी मागण्या आपल्या मार्गदर्शनातून उमेश कोराम मुख्य संयोजक यांनी विशद केले. मंडल यात्रा स्वागत समारंभाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन सामाजिक कार्यकर्ते अनिल बळी यांनी केले. सकल ओबीसी महामोर्चात मंडल यात्रेतील सहभागी सर्व मान्यवरांना नाश्ता व चहाची व्यवस्था अरुण बळी व विकास सुभाष बळी यांनी केली. ऐतिहासिक ‘मंडल यात्रा’ दिनांक 3 ऑगस्ट 2026 सोमवारपासून 12 एकूण सुरुवात झाली दिनांक 9 ऑगस्ट 2024 रविवारला प्रियदर्शनी सभागृह चंद्रपूर येथे समारोप होणार आहे. ही यात्रा अकरा जिल्ह्यातून भेट देत देत जाणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात संपूर्ण मार्गावर आणि शहरांमध्ये ओबीसी समाजबांधव,महिला व युवकांकडून मंडल यात्रेचे अभूतपूर्व जल्लोषात आणि ढोल-ताशांच्या गजरात स्वागत करण्यात येत आहे.महापुरुषांच्या पुतळ्यांना माल्यार्पण व अभिवादन विनम्र अभिवादन करण्यात येत आहे. ओबीसी महामोर्चाचे मुख्य संयोजक उमेश कोराम यांनी केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांवर सडकून टीका करत घणाघाती हल्ला चढवला.ते म्हणाले की, “गेल्या ९० वर्षांपासून ओबीसींची स्वतंत्र जातीनिहाय जनगणना झालेली नाही.जनगणनेत स्वतंत्र कॉलम नसल्यामुळे एकट्या महाराष्ट्रातील ओबीसी समाजाचे तब्बल ९५ हजार कोटी रुपयांचे अतोनात आर्थिक, सामाजिक आणि राजकीय नुकसान होत आहे. सरकार ओबीसी समाजाच्या न्याय्य हक्कांकडे सतत दुर्लक्ष करत असून, हा अन्याय आता सहन केला जाणार नाही.” ज्येष्ठ ओबीसी नेते विजय वडेट्टीवार आणि मुख्य संयोजक उमेश कोराम यांच्या नेतृत्वात संपूर्ण ताकदीने आपल्या पुढील टप्प्याकडे वेगाने मार्गक्रमण करत आहे.”आगामी जनगणनेत जर ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलम दिला गेला नाही, तर हा लढा इथेच थांबणार नसून संपूर्ण महाराष्ट्रभर तीव्र व अभूतपूर्व ‘महाआंदोलन’ उभे केले जाईल,” असा स्पष्ट इशारा याप्रसंगी देण्यात आला. नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.
