कार्यालयातील दूरध्वनी सेवा तात्काळ सुरू; नागरिकांच्या सोयीसाठी अधिकाऱ्यांचे अधिकृत मोबाईल क्रमांक सार्वजनिक

कार्यालयातील दूरध्वनी सेवा तात्काळ सुरू; नागरिकांच्या सोयीसाठी अधिकाऱ्यांचे अधिकृत मोबाईल क्रमांक सार्वजनिक

नांदुरा तालुका प्रतिनिधी संदेश पहुरकर

दि. ०९ सप्टेंबर २०२६ :जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, बुलढाणा यांच्या कार्यालयातील नादुरुस्त दूरध्वनी सेवा तात्काळ सुरू करावी तसेच संबंधित अधिकाऱ्यांचे अधिकृत मोबाईल क्रमांक नागरिकांसाठी सार्वजनिक करावेत, या मागणीसाठी दत्तात्रय प्रकाश करांगळे, सामाजिक कार्यकर्ता तथा माहिती अधिकार संघर्ष समिती, महाराष्ट्र राज्य, जिल्हाध्यक्ष बुलढाणा यांनी आपले सरकार पोर्टलवर तक्रार नोंदविली होती.कार्यालयातील दूरध्वनी सेवा मागील काही दिवसांपासून बंद असल्यामुळे नागरिकांना कार्यालयाशी संपर्क साधताना अडचणींचा सामना करावा लागत होता. या समस्येबाबत दत्तात्रय प्रकाश करांगळे यांनी तक्रार नोंदवून नागरिकांच्या संपर्काच्या दृष्टीने दूरध्वनी सेवा तात्काळ सुरळीत करण्याची मागणी केली होती.या तक्रारीची दखल घेत जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, बुलढाणा यांच्या कार्यालयाकडून बंद असलेली दूरध्वनी सेवा सुरू करण्यात आल्याचे कळविण्यात आले आहे.तसेच नागरिकांच्या सोयीसाठी कार्यालयातील संबंधित अधिकाऱ्यांचे अधिकृत मोबाईल क्रमांक सार्वजनिक करण्यात आले आहेत. त्यामुळे सहकारी संस्था तसेच कार्यालयीन कामकाजासंदर्भात नागरिकांना आवश्यक माहिती, मार्गदर्शन आणि संपर्क सुविधा मिळविणे अधिक सुलभ होणार आहे.कार्यालयाकडून उपलब्ध करून देण्यात आलेल्या माहितीनुसार, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, बुलढाणा, सहाय्यक निबंधक (प्रशासन) तसेच कार्यालय अधीक्षक यांचे अधिकृत संपर्क क्रमांक नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत.नागरिकांच्या दैनंदिन शासकीय कामकाजातील अडचणी दूर करण्याच्या दृष्टीने करण्यात आलेल्या या कार्यवाहीचे सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय प्रकाश करांगळे यांनी स्वागत केले आहे. शासकीय कार्यालयांमध्ये नागरिकांसाठी संपर्क सुविधा सुरळीत, सुलभ आणि पारदर्शक ठेवण्यात याव्यात, यासाठी यापुढेही पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.दत्तात्रय प्रकाश करांगळेसामाजिक कार्यकर्तामाहिती अधिकार संघर्ष समिती, महाराष्ट्र राज्यजिल्हाध्यक्ष, बुलढाणा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *