७ ऑगस्टला पोलीस पाटीलांचा मेळावा

ऑगस्टला पोलीस पाटीलांचा मेळावा

वाशीम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव)

महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघ, वाशिम जिल्हाच्या वतीने संघटनेच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त भव्य वर्षपूर्ती सोहळा, मार्गदर्शनपर कार्यशाळा व सन्मान सोहळ्याचे आयोजन ७ ऑगस्ट रोजी सकाळी ११.३० वाजता मालेगाव रोडवरील वाटाणे लॉन, वाशिम येथे करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाराष्ट्र राज्यगाव कामगार पोलीस पाटील संघाचे राज्याध्यक्ष बाळासाहेब शिंदेविविध विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत. कार्यशाळेमध्ये पोलीस पाटील यांच्या दैनंदिन कामकाजाशी संबंधित प्रशासकीय बाबी, कायदे, जबाबदाऱ्या, शासनाच्या विविध योजना, संघटनात्मक बळकटीकरण तसेच पोलीस पाटील यांच्या समस्या व त्यावरील उपाययोजनांबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. याशिवाय उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पोलीस पाटीलांचा सन्मानही या कार्यक्रमात करण्यात येणार आहे. संघटनेच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमास वाशिम जिल्ह्यातील सर्व पोलीस पाटील बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करावा, असे आवाहन संघटनेचे प्रवक्ते समाधान गुडदे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *