वाकोडी फाटा ते बोदवड रोड येथील पुलापर्यंत दोन्ही बाजूने नाली बांधकामासाठी भरीव निधी उपलब्ध करून द्या अशी मागणी

वाकोडी फाटा ते बोदवड रोड येथील पुलापर्यंत दोन्ही बाजूने नाली बांधकामासाठी भरीव निधी उपलब्ध करून द्या अशी मागणी

मलकापूर प्रतिनिधी दिनेश आसटकर

आज मा. आ. श्री चैनसुख संचेती साहेब यांच्या नेतृत्वाखाली वाकोडी ग्रामपंचायत सदस्य पराहुल राजपूत व सामाजिक कार्यकर्ते किरण फिरके यांनी आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांना निवेदन सादर केले मा. मंत्री यांनी प्रधान सचिव आपत्ती व्यवस्थापन यांना प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले आहेत तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री मंत्री श्री मकरंद आबा पाटील यांचे कडे सुद्धा निवेदन द्वारे प्रभाग मध्ये झालेल्या नुकसानाची माहिती दिली यावर पालकमंत्री यांनी जिल्हाधिकारी बुलढाणा यांना माहिती घेऊन पुढील कार्यवाही जलद गती ने करण्याचे आदेश दिले. तसेच ग्रामविकास मंत्री श्री जयकुमार गोरे साहेब यांना सुद्धा निवेदन देऊन वाकोडी ग्रामपंचायत हद्दी मध्ये आलेल्या पाण्याच्या माहिती दिली व मूलभूत सुविधा योजने अंतर्गत काम मंजूर करण्यात यावे ही विनंती केली आहे मा. मंत्री गोरे साहेब यांनी प्रधान सचिव ग्रामविकास यांना प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *