बातमीची दखल अखेर जवळखेड खुर्द येथील जिल्हा परिषद शाळेला शिक्षणाधिकारी यांनी दिली भेट पालक व जीवन खवले यांच्या मागणीला यश

अखेर जवळखेड खुर्द येथील जिल्हा परिषद शाळेला शिक्षणाधिकारी यांनी दिली भेट पालक व जीवन खवले यांच्या मागणीला यश

अकोला जिल्हा प्रतिनिधी देवानंद खीरकर

अकोट पंचायत समिती अंतर्गत गट ग्रामपंचायत जवळखेड व जवळखेड खुर्द येथील जि.प.शाळा येथे वर्ग चार व शिक्षक एक अशी बिकट परिस्थिती निर्माण झाली होती.या शाळेत गरीब,शेतकरी व शेतमजूर यांचे मुलं शिक्षण घेत आहेत.पण येथे वर्ग चार असून शिक्षिक मात्र एकच होते.त्यामुळे शिक्षणाचा बट्टाबोळ उडाला असून मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष नसल्याचा आरोप सुरू होता.त्या शाळेवर ज्या शिक्षिका आहेत त्या शिक्षिका सुध्दा वेळेवर हजर राहत नाहीत.शाळेमध्ये खिचडी शिकविण्याच्या जागेच्या आज बाजूला मोठमोठे दोन ते तीन फुटापर्यंत गवत वाढलेल आहे.मुल ही अभ्यास न करता बाहेर खेळतात मुलांना शिक्षण सोडून शाळेतील गवत काढायला लावल अशी बिकट परिस्थिती होती.या मुलांच्या कडे कोणीही लक्ष द्यायला तयार नाही.त्यामुळे पालकांनी अकोट तालुका शिक्षक अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.तरी त्यांनी सुद्धा या गंभीर बाबीकडे लक्ष दिले नसल्याचा आरोप शाळेतील मुलांच्या पालकां कडून करण्यात आला होता.त्या मुले शाळेतील मुलांचे दाखले शाळेतून काढण्यास पालकांनी सुरुवात केली होती.वरिष्ठांनी याची दखल घेऊन गावांमध्ये येऊन स्वतः शाळेला भेट द्यावी अशी आग्रही मागणी जीवन खवले व पालक यांचे करण्यात आली होती.व जिल्हा परिषद शाळा वाचल्या पाहिजेत आणि ह्या शाळा बंद पडला पाहिजे नाही.यासाठी लवकरात लवकर शिक्षकाची नियुक्ती करावी.या शाळेतील संगणक सुध्दा बंद पडले आहे.मुलांचे ऑनलाईन शिक्षण सुध्दा बंद आहे.या बाबत अजिंक्य भारत वृत्त पत्रामध्ये बातमी प्रकाशित करण्यात आली होती.या बाबत प्रहारचे उपजिल्हाप्रमुख जीवन खवले यांनी आज शाळेत जाऊन स्वत शाळेला भेट देऊन तेथील समस्या एकूण घेतल्या.या बाबत लवकरात लवकर दखल घ्यावी व दखल न घेतल्यास आम्ही प्रहार जनशक्ती पक्षाचे वतीने तीव्र आंदोलन करू असा इशारा दिला होता.याची ताबडतोब दखल घेऊन अकोट शिक्षणाधिकारी,केंद्रप्रमुख यांनी स्वतः शाळेला भेट दिली.व मुलांच्या पालकांचे व जीवन खवले यांच्या समस्यांचे निराकरण केले.व तत्काळ एका शिक्षकाची नियुक्ती केली.व आणखी दोन शिक्षक येत्या १५ ऑगस्ट पर्यंत देण्यात येतील असे आश्वासन दिले.व पालकांचे समाधान केले.*प्रतिक्रिया*अकोट शिक्षणाअधिकारी व केंद्रप्रमुख यांनी ताबडतोब दखल घेऊन आज शाळेला स्वत भेट दिली.व शाळेतील मुलांच्या पालकांच्या समस्यांचे निराकरण करून ,तात्काळ एका शिक्षकाची नियुक्ती केली.व १५ ऑगस्ट पर्यंत आणखी दोन शिक्षक देण्यात येतील असे आश्वासन दिले.व आमचे समाधान केले.जीवन खवले उपजिल्हा प्रमुख प्रहार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *