जवळखेड खुर्द येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षणाचा बट्टाबोल वर्ग चार व शिक्षक एक

जवळखेड खुर्द येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षणाचा बट्टाबोल वर्ग चार व शिक्षक एक

अकोला जिल्हा प्रतिनिधी देवानंद खिरकर

अकोटपंचायत समिती अकोट अंतर्गत गट ग्रामपंचायत जवळखेड व जवळखेड खुर्द येथील जि.प.शाळा येथे वर्ग चार व शिक्षक एक अशी परिस्थिती आहे.या शाळेत गरीब,शेतकरी व शेतमजूर यांचे मुलं शिक्षण घेत आहेत.पण येथे वर्ग चार असून एक शिक्षिक मात्र एकच आहे.त्यामुळे शिक्षणाचा बोजारा उडाला असून मुलांच्या शिक्षणाकडे अभिजीत लक्ष नसल्याचा आरोप सुरू आहे.त्या शिक्षिका वेळेवर हजर राहत नाहीत.शाळेमध्ये खिचडी व्यवस्था नाही.शाळेच्या आवारामध्ये दोन ते तीन फुटापर्यंत गवत वाढलेल आहे.मुलं बाहेर खेळतात मुलांना शिक्षण सोडून शाळेतील गवत काढायला लावलअशी परिस्थिती आहे.त्या मुलांच्या कडे कोणीही लक्ष द्यायला तयार नाही.त्यामुळे पालकांनी अकोट तालुका शिक्षक अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.तरी त्यांनी सुद्धा या गंभीर बाबीकडे लक्ष दिले नसल्याचा आरोप पालक करीत आहेत.त्या मुले शाळेतील मुलांचे दाखले शाळेतून काढण्यास पालकांनी सुरुवात केली असल्याची माहिती आहे.त्या मुले वरिष्ठांनी याची दखल घेऊन गावांमध्ये भेट द्यावी.व जिल्हा परिषद शाळा वाचल्या पाहिजेत आणि ह्या शाळा बंद पडला पाहिजे नाही.यासाठी लवकरात लवकर शिक्षकाची नियुक्ती करावी.या बाबत प्रहारचे उपजिल्हाप्रमुख जीवन खवले यांनी आज शाळेत जाऊन स्वत भेट घेतली व चर्चा केली.या बाबत लवकरात लवकर दखल घ्यावी व दखल न घेतल्यास आम्ही प्रहार जनशक्ती पक्षाचे वतीने तीव्र आंदोलन करू असा इशारा दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *