
शासकीय विहिरीजवळ पाणी भरताना मोटारचा विजेचा शॉक लागून युवकाचा दुर्दैवी मृत्यू पळशी सुपो येथील 29 वर्षीय बादल जगदेव अंभोरे यांचा दुर्दैवी अंत; गावात हळहळ व्यक्त
जळगाव जामोद तालुका प्रतिनिधी सुरेंद्र गवई
:जळगाव जामोद तालुक्यातील पळशी सुपो येथील रहिवासी बादल जगदेव अंभोरे (वय 29 वर्षे) यांचा विजेचा शॉक लागल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, बादल अंभोरे हे शासकीय विहिरीजवळ पाणी भरण्यासाठी गेले होते. यावेळी विहिरीवर लावलेल्या मोटारीच्या विद्युत प्रवाहाचा शॉक लागल्याने ते गंभीर जखमी झाले. परिसरातील नागरिकांनी त्यांना तातडीने उपचारासाठी नेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.या दुर्दैवी घटनेमुळे पळशी

सुपो गावासह परिसरात शोककळा पसरली असून, अंभोरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गावातील नागरिकांनी हळहळ व्यक्त करत मृताच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत.घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणा व पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून पुढील कार्यवाही सुरू आहे. मृत्यूच्या या घटनेमुळे विद्युत उपकरणांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
