
माँ चंडिका फाउंडेशन तर्फे मोफत रक्तगट तपासणी शिबिर संपन्न
देवानंद खिरकर अकोला जिल्हा प्रतिनिधी
माँ चंडिका फाउंडेशनचे अध्यक्ष कुणाल राजकुमार खंडेराय यांच्या आयोजनातून आज मोफत रक्तगट तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हे शिबिर मोठ्या उत्साहात व यशस्वीरीत्या पार पडले.या शिबिरात इयत्ता १ ली ते ७ वी पर्यंतच्या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी तसेच इयत्ता ८ वी ते १० वी च्या यशोदा माध्यमिक विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांना स्वतःचा रक्तगट माहिती व्हावा या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.या शिबिरासाठी एल एस ओ सुधीर चव्हाण यांनी तपासणी केली सीएचओ बेग मॅडम, तर आरोग्य सेवक, सुनील हरने व आरोग्य सेविका मनीषा गिरी यांचे विशेष सहकार्य लाभले. या सामाजिक उपक्रमाचे पालक व शिक्षक वर्गातून कौतुक होत आहे.शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक वृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.आयोजककुणाल राजकुमार खंडेराय अध्यक्ष माँ चंडिका फाउंडेशन
