
अकोट ग्रामीण पोलीसांनी महाराष्ट्र जिवन प्राधिकरण योजनेतील पाईप चोरूण नेणा-या टोळीचा केला पर्दाफाश ९,३९,२२८/रू चे पाईपांसह दोन आयशर ट्रक, एक फोरव्हिलर वाहनासह तीन आरोपी अटकेत एकुण ४३,३९,२२८/रू.मुददेमाल जप्त
देवानंद खिरकर अकोला जिल्हा प्रतिनिधी
जिल्हा पोलीस अधिक्षक अर्चित चांडक यांनी दिलेल्या सुचणेप्रमाणे पोलीस स्टेशन हददीत मालमत्ता तसेच चोरी संबंधी गुन्हयाला आळा बसावा व आगामी सण उत्सव संबंधाने प्रत्येक गावात पोलीसांनी पेट्रालिंग दरम्यान सतर्कपणे गस्त करण्याबाबत दिलेल्या आदेशान्वये दिनांक १४/०९/२०२६ रोजी पोलीस स्टेशन हददीत नाईट ऑफीसर हे पेट्रोलिंग करीत असतांना अकोली जहाँगीर फाटा येथे दोन आयशर ट्रकमध्ये काही ईसम हे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनेतील कामाकरीता ठेवलेले पाईप आयशर ट्रकमध्ये घेवुन जातांना दिसले.पोलीस घटनास्थळी पोहचताच काही ईसम फोर व्हिलर वाहनासह पळून गेले व घटनास्थळी असलेल्या दोन आयशर ट्रक व चालक यांना ताब्यात घेवुन विचारपुस केली असता, उडवाउडवीचे उत्तरे दिली.दोन्ही वाहन पोलीस स्टेशनला डिटेन करण्यात आले.महाराष्ट्र जिवन प्राधीकरण उपविभाग अकोट येथील अधिका-यानी पोलीस स्टेशनला डिटेन करण्यात आलेल्या वाहनातील पाईपाबाबत कळविले असता.त्यांनी सदरचे पाईप हे महाराष्ट्र जिवन प्राधिकरण योजनेतील कामावरील असल्याची खात्री झाल्याने त्यांचे जबानी रिपोर्टवरून महाराष्ट्र जिवन प्राधिकरण योजनेतील कामावरील १) पोपटखेड गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेतल ८२ पाईप किंअं ९,३९,२२८/रू चा मुददेमाल चोरून नेले.अशा रिपोर्टवरून पोलीस स्टेशनला अप.नं.६४२/२०२६ कलम ३०३ (२), ३ (५) बीएनएस अन्वये गुन्हा दाखल केला. आयशर ट्रक चालक नामे १) मनिष अरूणराव मैन वय २९ वर्ष रा.नटाळा पुर्नवसन वार्ड नं.०२ वर्धा २) कपील अशोकराव दुधे वय ४१ वर्ष रा.पुजई, ता.जि.वर्धा यांना सदर गुन्हयात अटक करून पीसीआर दरम्यान आरोपी नामे प्रभाकर वसंतराव भताने वय ३९ वर्ष रा.गोढाळा ता.रेणापुर,जि.लातुर यांचे सांगणेप्रमाणे चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.सदर गुन्हयाचा तपास सुरू आहे. ही कारवाई अर्चित चांडक पोलीस अधिक्षक अकोला,बी.चंद्रकांत रेडडी अप्पर पोलीस अधिक्षक,निखील पाटील सहायक पोलीस अधिक्षक,नितीन लेव्हरकर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा अकोला यांचे मार्गदर्शनाखाली श्रीधर गुठठे ठाणेदार पोलीस स्टेशन अकोट ग्रामीण,पोउपनि वैभव तायडे पोहेकॉ योगेश जउळकार,पोहेकॉ भाष्कर सांगळे,पोहेकों गोपाल जाधव,पोहेकॉ गणेश फोकमारे, पोहेकॉ विठठल चव्हाण,पोहेकॉ शैलेश जाधव,पोकॉ शुभम लुंगे, पोकों शुभम गिरी,सायबर पो.स्टेचे पोकों आशिष आमले,पोकॉ स्वप्नील दामोदर,होमगार्ड सैनि सैनिक सुनिल वाळके,प्रविण इंगळे यांनी केली.
