मटन खाताय सावधान एकाचा झाला मृत्यू किन्हीराजा मध्ये अत्यंत धक्कादायक घटना आली समोर मटण खाणे बेतले जीवावर

मटन खाताय सावधान एकाचा झाला मृत्यू किन्हीराजा मध्ये अत्यंत धक्कादायक घटना आली समोर मटण खाणे बेतले जीवावर; घशात हड्डी अडकल्याने एका व्यक्तिचा मृत्यू

वाशीम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव)

मालेगाव तालुक्यातीलकिन्हीराजा येथे 4 आॅगष्ट रोजी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. किन्हिराजा येथील एक व्यक्ती मटण खात असतांना मटणातील हाड (हड्डी) घशात अडकले त्यामुळे त्याला श्वास घेण्यास ञास होत होता. नातेवाईकांनी लगेच त्याला स्थानिक शासकीय रूग्णालयात दाखल केले.वैद्यकीय अधिकारी यांनी क्षणाचाही विलंब न करता व कुठल्याही प्रकारची चिरफाड न करता तातडीने त्याच्या घशात अडकलेले मटनाचे हाड बाहेर काढले परंतु तो पर्यंत वेळ निघुन गेली होती.कारण घशात अडकलेल्या मटणातील हड्डीमुळे त्याला श्वास घेता आला नाही.त्यामुळे श्वास गुदमरुन त्याचा मृत्यू झाला. होता.वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्याला मृत घोषित केले.या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.त्यामुळे मटणावर ताव मारतांना त्यावर तुटून पडू नका, जरा सांभाळूनच ताव मारा. मटण किंवा चिकन खाताना अजीबात घाई करु नका.नाही तर तुमचाही जीव धोक्यात येउ शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *