अमानी ते रिठद रस्त्याचे काम सुरू करा अन्यथा १५ ऑगस्टला जलसमाधी घेण्याचा इशारा,

अमानी ते रिठद रस्त्याचे काम सुरू करा!अन्यथा १५ ऑगस्टला जलसमाधी घेण्याचा इशारा,

वाशीम जिल्हा प्रतिनिधी अनिल जाधव

दि,५ :-मालेगाव तालुक्यातील अमानी ते रिठद रस्त्याचे काम सुरू करण्यात यावे, अन्यथा १५ 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन जलसमाधी घेण्यात येईल असा इशारा लेकी निवेदनाद्वारे शिवसेनेचे कार्यकर्ते शंकर वाझुळकर यांनी आज दि,५ ऑगस्ट ला वाशिम येथील कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग या अधिकाऱ्याला देण्यात आले असून या पृर्वि देखील लोकप्रतिनिधी तसेच संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले होते परंतु अद्याप याची दखल घेतली नसल्यामुळे नाही, आज परत रस्ता सुरू करण्याच्या संदर्भात जलसमाधीचा इशारा देण्यात आला आहे, या प्रसंगी शिवसेनेचे ओबीसी सेलचे उपजिल्हाप्रमुख विवेक गवळी, मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक भुषन खाडे यांची देखील उपस्थित लागली होती अमानीसह करंजी शेलगाव ओंकारगिर , दापुरी कालवे,मुंडा,सोमठांना असे अनेक गावे येत असून जवळपास 18 किलोमीटरचा लांबी चा हा रस्ता अतिशय खराब झाल्याने बरेच अपघात या रस्त्याने होत असून या रस्त्यानेअनेकमोठ मोठे,खडे, खड्यात पाणी,चिखल आहे, रस्त्याने शाळकरी मुले वृद्ध लोक शेतकरी ,टूव्हीलर ट्रॅक्टर ,गाड्या या मार्गाने ये जा करतात , रस्ता अतिशय खराब झाल्याने अनेक अडचणी निर्माण होतात करिता या रस्त्याचे काम तात्काळ सुरू करावे, अन्यथा जलसमाधी घेण्यात येईल असा इशारा निवेदनकर्त्यांनी केला आहे याप्रसंगी निलेश चांडे, महेश लहाने यांच्या सह आदी कार्यकर्ते उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *