
आधार केंद्राकडून मिशन मोड अभियानाला सुरवात
वाशीम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव)
तालुक्यातील किन्हिराजा येथील शिवाजी शाळेत सध्या ५ ते १५ वर्ष वयातील विद्यार्थी व विद्यार्थीनीचे आधारकार्ड एम बी युव (मिशन मोड अभियान) ला सुरवात झाली असुन या योजनेचा लाभ पात्र विध्यार्थींनीघ्यावा असे आवाहण आधार कार्ड केद्राचे संचालक दिनेश अग्रवाल व ऑपरेटर अविनाश नाईक यांणी केले आहे. शिवाजी शाळेत सध्या आधारकार्ड, मिशन मोड अभियानाला सुरवात झाली असून हे अभियान पाच वर्षापासुन ते पंधरा वर्ष वय असलेल्या वीध्यर्थी साठी असुन यात वीध्यार्थींचे आधारकार्ड वरील फोटो बदल सह अनेक नवीन अपडेट होणार असून दोन आठवड्याच्या या अभीयानात आधार बायोमेट्रिक एम बी युव करन्यात येणार आहे. आजपासुन श्री शिवाजी हायस्कुल मध्ये या सुविधा उपलब्ध करून दील्या असून. आधार केंद्र संचालक दिनेश अग्रवाल ऑपरेटर अविनाश नाईक, मुख्याध्यापक जी डी जाधव यांना भेटून विद्यार्थ्यांना आपले आधारकार्ड बायोमेट्रिक करून घ्यावे असे आवाहन अग्रवाल यांनी केले आहे.
