मनसेच्या तालुका अध्यक्षा कल्पना पोतर्लावार यांचे बेकायदेशीर ऑनलाइन लॉटरी विरोधात पोलिसांना निवेदन

मनसेच्या तालुका अध्यक्षा कल्पना पोतर्लावार यांचे बेकायदेशीर ऑनलाइन लॉटरी विरोधात पोलिसांना निवेदन

युवकांची आर्थिक फसवणूक थांबविण्याची मागणी; संबंधितांवर कठोर कारवाईची मागणीबल्लारशा : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तालुका अध्यक्षा कल्पना पोतर्लावार यांच्या नेतृत्वाखाली बल्लारशा शहरात सुरू असलेल्या बेकायदेशीर ऑनलाइन लॉटरीच्या दुकानांविरोधात पोलिस प्रशासनाकडे ठोस कारवाईची मागणी करण्यात आली. यासंदर्भात मा. पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे बल्लारशा यांना निवेदन सादर करून संबंधितांवर तातडीने कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.निवेदनात म्हटले आहे की, बल्लारशा शहरातील विविध भागांमध्ये बेकायदेशीर ऑनलाइन लॉटरीचे जाळे दिवसेंदिवस वाढत असून, त्यामध्ये युवक, कष्टकरी, कामगार तसेच सर्वसामान्य नागरिक मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणुकीचे बळी ठरत आहेत. झटपट पैसे मिळविण्याच्या आमिषाने अनेक कुटुंबांचे आर्थिक नुकसान होत असून, या प्रकारामुळे सामाजिक व आर्थिक समस्या निर्माण होत असल्याची बाबही मनसेच्या वतीने निदर्शनास आणून देण्यात आली.मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी या बेकायदेशीर व्यवसायामागील संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करून शहरातील सर्व ऑनलाइन लॉटरी केंद्रे कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी केली. अशा अवैध व्यवसायांना आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने नियमित तपासणी मोहीम राबवावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली.यावेळी जनहित कक्षाचे जिल्हाध्यक्ष रमेश भाऊ काळबांडे, वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष महेश भाऊ वासलवार, शहराध्यक्ष पियुष धुपे, वाहतूक सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष नवाब शेख, मनसैनिक शालूताई जोगे, जयश्री जोगे, शिखाताई दास तसेच शशिकला जोगे उपस्थित होते.यावेळी मनसेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले की, “युवकांचे भविष्य आणि सर्वसामान्य नागरिकांच्या कष्टाच्या पैशाची लूट करणाऱ्या बेकायदेशीर ऑनलाइन लॉटरी व्यवसायाला कोणत्याही परिस्थितीत थारा दिला जाणार नाही. प्रशासनाने तातडीने कठोर कारवाई करावी, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना जनतेच्या हितासाठी लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन उभारेल.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *