शेगांव ते भोटा बससेवा पूर्ववत सुरू; मनविसेच्या पाठपुराव्याला यशविद्यार्थी आणि ग्रामस्थांची गैरसोय दूर; एस.टी. बसचे ग्रामस्थांकडून उत्साहात स्वागत

शेगांव ते भोटा बससेवा पूर्ववत सुरू; मनविसेच्या पाठपुराव्याला यशविद्यार्थी आणि ग्रामस्थांची गैरसोय दूर; एस.टी. बसचे ग्रामस्थांकडून उत्साहात स्वागत

नांदुरा तालुका प्रतिनिधी

नांदुरा (दि. ५ ऑगस्ट २०२६):*तालुक्यातील भोटा येथे धावणारी शेगांव आगाराची बससेवा गेल्या अनेक महिन्यांपासून बंद असल्यामुळे विद्यार्थी आणि नागरिकांची होत असलेली अतोनात गैरसोय दूर झाली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या (मनविसे) सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे ही बससेवा अखेर आजपासून (दि. ५ ऑगस्ट) पूर्ववत सुरू करण्यात आली आहे.भोटा गावासाठी शेगांव आगाराची सकाळी १०:०० वाजता आणि संध्याकाळी ५:०० वाजताची बससेवा मागील काही महिन्यांपासून बंद होती. यामुळे महाविद्यालयीन विद्यार्थी, शाळकरी मुले आणि दैनंदिन प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. ही गंभीर समस्या लक्षात घेऊन, मनविसेच्या वतीने मनसे नेते तथा राज्य उपाध्यक्ष राजुभाऊ उंबरकर व मनसे जिल्हाध्यक्ष अमित बाप्पू देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली मनविसे जिल्हा उपाध्यक्ष शिवचरण पारस्कर, मनविसे जिल्हा सचिव राहुल चोपडे व मनसे शेगांव तालुकाध्यक्ष नितीश भावरकर यांनी मागील महिन्यात म्हणजेच ११ जुलै रोजी शेगांव आगार प्रमुखांना अधिकृत निवेदन देऊन बससेवा लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी करण्यात आली होती. मनविसेच्या या आक्रमक व पाठपुराव्याला अखेर यश आले असून आजपासून बसफेऱ्या पूर्ववत सुरू झाल्या आहेत.बस गावात पुन्हा सुरू झाल्यामुळे ग्रामस्थांनी आणि विद्यार्थ्यांनी तीव्र समाधान व्यक्त केले आहे. बसचे आगमन झाल्यावर भोटा येथे बसचे व त्यावरील चालक-वाहक कर्मचाऱ्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी मनविसे जिल्हा उपाध्यक्ष शिवचरण पारस्कर, मनविसे जिल्हा सचिव राहुल चोपडे, भोटाचे सरपंच पती कडू भोटकर आणि भोटाचे माजी पोलीस पाटील विश्वनाथ पारस्कर यांच्या हस्ते चालक व वाहकांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.या ऐतिहासिक व आनंदाच्या क्षणी मनविसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, आदरणीय ग्रामस्थ आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. बससेवा सुरू झाल्याने गावकऱ्यांनी मनविसेच्या नेतृत्वाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *