
जळगाव जामोद : डीवायडरला धडकून युवकाचा दुर्दैवी मृत्यू
जळगाव जामोद प्रतिनिधी सुरेंद गवई
बुलढाणा जिल्ह्यातील दादूलगाव येथील मुरलीधर सुरडकर यांचा जळगाव–नांदुरा रोडवर झालेल्या भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना मंगळवार–बुधवार दरम्यान रात्री अंदाजे २ ते ३ वाजण्याच्या सुमारास घडल्याची प्राथमिक माहिती आहे.अपघातानंतर राजू बूटे व आशीष पाटील यांनी तत्परता दाखवत जखमी युवकाला रुग्णवाहिकेतून ग्रामीण रुग्णालय, जळगाव जामोद येथे दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले.या अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, पुढील तपास संबंधित पोलीस करीत आहेत.
