जनसामान्यांचा विश्वास संपन्न करा नरेश शेळके.आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या सत्ता स्थापनेसाठी तयारीला लागा

जनसामान्यांचा विश्वास संपन्न करा- नरेश शेळके.आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या सत्ता स्थापनेसाठी तयारीला लागा – प्रसेनजीत पाटिल.

जळगाव जामोद प्रतिनिधी सुरेंद्र गवई

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या बुलढाणा जिल्हा विस्तारित कार्यकारिणीची नुकतीच घोषणा आपण केली. यामध्ये नव्या जुन्या कार्यकर्त्यांचा समन्वय साधत नेतृत्व करण्याची इच्छा असलेल्या होतकरू कार्यकर्त्यांना पदाच्या माध्यमातून कामे करण्याची संधी देण्यात आली. तरी मिळालेल्या पदाच्या माध्यमातून नियोजनपूर्वक पक्ष संघटन मजबूत करत असतानाच सर्वसामान्य ,उपेक्षित घटकांसाठी कामे करा व कामाच्या माध्यमातून जनसामान्यांचा विश्वास संपन्न करा असे मत नरेश शेळके जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार बुलढाणा यांनी विस्तारित कार्यकारिणीच्या प्रथम बैठकी निमित्त दिनांक 3 ऑगस्ट 2026 रोजी राष्ट्रवादी भवन बुलढाणा येथे केले. याप्रसंगी प्रसेनजित पाटील जिल्हाध्यक्ष (उत्तर), पंकज नाना बोराडे जिल्हा पक्ष निरीक्षक (दक्षिण), विश्वनाथ कांबळे पक्ष निरक्षक (उत्तर) यांच्यासह जिल्ह्यातील नेते मंडळी उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या बुलढाणा जिल्हा विस्तारीत कार्यकारणीची नुकतीच विदर्भ प्रभारी माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या सूचनेने प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या मान्यतेने दोन्ही जिल्हाध्यक्षांनी संयुक्तपणे घोषणा केली. तसेच आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकी मध्ये युत्या आघाड्याचा विचार न करता राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार ) पक्षाची सत्ता स्थापनेसाठी सर्वानी कामाला लागण्याचे आवाहन यावेळी प्रसेनजीत पाटिल यांनी केले.या कार्यकारणीची प्रथम बैठक दिनांक 3 ऑगस्ट रोजी राष्ट्रवादी भवन बुलढाणा येथे संपन्न झाली. प्रास्ताविक भाषणामध्ये प्रदेश उपाध्यक्ष संगीतराव भोंगळ यांनी जिल्ह्यातील संघटनात्मक बाबीचा आढावा देत पक्ष संघटन मजबूत करण्याबाबत काही सूचना केल्यात. जिल्हाध्यक्ष प्रसेनजीत पाटील त्यांनी आपल्या भाषणामध्ये सांगितले की नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी अशा पद्धतीने आपले पक्ष संघटन मजबूत करा की, आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था व इतर निवडणुकींमध्ये आपल्या पक्षाला आघाडीमध्ये सन्मान जनक स्थान मिळाले तर ठीक ,अन्यथा स्वबळावर लढवण्याची तयारी आपण सर्वांनी ठेवावी. यावेळी पक्ष निरीक्षक पंकज नाना बोराडे व प्रा. विश्वनाथ कांबळे, माजी जिल्हाध्यक्ष साहेबराव सरदार यांनी देखील पक्ष संघटनात्मक बांधणी बाबत मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रसेनजीत पाटील यांनी डॉ. राजेंद्र शिंगणे साहेबांची जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या संचालक पदी अविरोध निवड झाल्याबद्दल अभिनंदनचा ठराव मांडला. या ठरावास जिल्हा उपाध्यक्ष पी एम जाधव यांनी अनुमोदन दिले व सर्वांनी टाळ्या वाजवून अभिनंदनचा ठराव पारित केला. यावेळी राम राठोड यांची प्रांताध्यक्ष शिक्षक आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पदावर निवड झाल्याबद्दल त्यांचे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी माजी आमदार नानाभाऊ कोकरे, प्रदेश सरचिटणीस संतोषराव रायपुरे, प्रदेश सरचिटणीस बी टी जाधव, प्रदेश सचिव अफ्ताफ खान, प्रदेश सदस्य तात्या कृपा, अल्पसंख्यांक प्रदेश उपाध्यक्ष डॉ. रिजवान खान, रियाज खान, ज्योतीताई खेडेकर, अभय चव्हाण, दिनकरराव देशमुख, गंगाधर जाधव, सौरभ तायडे, आत्माराम कायंदे, वर्षाताई इंगळे, वर्षाताई वाघ, नाझीमाताई खान, मधुकर गव्हाड, सईद इकबाल, प्रशांत डोंगरदिवे, गणपत कुसळकर, अमोल भट, आशिष वायझोडे, पिंपरकर काका, किशोर मापारी, गजानन वायाळ, अनिल वर्मा, कबीर भाई यांच्यासह मोठ्या संख्येत जिल्हा कार्यकारणीतील पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन जिल्हा प्रवक्ता अजीम नवाज राही यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *