भोटा ते खामगाव बससेवा पुन्हा पूर्ववत सुरू मनविसेच्या प्रयत्नांना यश

भोटा ते खामगाव बससेवा पुन्हा पूर्ववत सुरू मनविसेच्या प्रयत्नांना यश

नांदुरा (प्रतिनिधी)

तालुक्यातील भोटा येथील बससेवा जलंब रेल्वे उड्डाणपुलाचे काम सुरू असल्यामुळे मागील काही महिन्यांपासून खामगाव ते भोटा ही एस.टी. बससेवा बंद होती. सदर बससेवा बंद असल्यामुळे भोटा, हिंगणा (भोटा), कालवड, कठोरा, भास्तन ,रोटी, हिंगणा (इसापूर), आणि पंचक्रोशीतील नागरिक तसेच शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना प्रचंड गैरसोय सहन करावी लागत होती.विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित आणि सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी लक्षात घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने दि. ११ जुलै २०२६ रोजी खामगाव एस.टी. आगार प्रमुखांना लेखी निवेदन देण्यात आले होते. या निवेदनाची एस.टी. महामंडळाने गांभीर्याने दखल घेत आज दि. ४ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ७:३० वाजता भोटा येथे बससेवा पुन्हा पूर्ववत सुरू केली आहे.बससेवा सुरू झाल्यानंतर ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला. यावेळी मनविसेचे जिल्हा उपाध्यक्ष *शिवचरण पारस्कर* , मनविसेचे जिल्हा सचिव *राहुल चोपडे*,सरपंच पती *कडू भोटकर* यांच्या हस्ते बसचे चालक श्री जाधव साहेब व वाहक श्री योगेंद्र डोंगरे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी मनविसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *