निर्बंधांमुळे अकोट तालुक्यातील ३३ ग्रा.पं.ची विकासकामे ठप्प निधी असूनही खर्चाला बंदी,ग्रा.पं. प्रशासकांसमोर पेच

निर्बंधांमुळे अकोट तालुक्यातील ३३ ग्रा.पं.ची विकासकामे ठप्प निधी असूनही खर्चाला बंदी,ग्रा.पं. प्रशासकांसमोर पेच

अकोला जिल्हा प्रतिनिधी देवानंद खिरकर

अकोटतालुक्यातील ३३ ग्रामपंचायतींचा कार्यकाळ फेब्रुवारी महिन्यात संपल्यानंतर शासनाच्या निर्देशानुसार विद्यमान सरपंचांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली.मात्र न्यायालयीन निर्देशांनुसार आर्थिक व्यवहारांवरील निर्बंधामुळे ग्रामपंचायतींची विकासकामे रखडल्याचा दावा अकोट तालुका सरपंच संघटनेने केला आहे.संघटनेच्या म्हणण्यानुसार ग्रामपंचायतींकडे विविध योजनांचा निधी उपलब्ध असूनही तो खर्च करता येत नसल्याने काँक्रीट रस्ते,नाल्या,खडीकरणतसेच साफसफाई विकासकामे ठप्प झाली आहेत.पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर ही कामे तातडीने होणे आवश्यक असतानाही आर्थिक व्यवहारांवरील मर्यादांमुळे अडचणी निर्माण झाल्या आहेत.याशिवाय यापूर्वी पूर्ण झालेल्या कामांची देयकेही प्रलंबित असल्याने संबंधित ठेकेदार आर्थिक संकटात सापडल्याचे सांगण्यात आले.तातडीने निर्णय घ्या एसआरआय संदर्भातील कारणांमुळे ग्रामपंचायत निवडणुका लांबल्याने ही परिस्थिती अधिक गंभीर झाल्याचा दावा करण्यात आला आहे.त्यामुळे प्रलंबित देयके अदा करण्यास,मंजूर विकासकामे सुरू करण्यास तसेच आर्थिक निर्बंध शिथिल करण्याबाबत शासनाने तातडीने निर्णय घ्यावा.अशी मागणी अकोट तालुका सरपंच संघटनेने केली आहे.*प्रतिक्रिया* गावांमध्ये जनसुविधांशी संबंधित अनेक विकासकामे मंजूर आहेत.मात्र आर्थिक निर्बंधांमुळे ती सुरू करता येत नाहीत.त्यामुळे नागरिकांचा रोष प्रशासकांवर व्यक्त होत असून शासनाने यावर तातडीने तोडगा काढावा.स्वाती गुजरकर प्रशासकग्रामपंचायत सावरा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *