ग्रामीण पत्रकार संघाची आढावा बैठक संपन्न अण्णा भाऊ साठे जयंतीनिमित्त भारतरत्नाची मागणी शेगाव येथे राज्यस्तरीय अधिवेशनाचे आयोजन

ग्रामीण पत्रकार संघाची आढावा बैठक संपन्न अण्णा भाऊ साठे जयंतीनिमित्त भारतरत्नाची मागणी, शेगाव येथे राज्यस्तरीय अधिवेशनाचे आयोजन

देवानंद खिरकर अकोला जिल्हा प्रतिनिधी

अकोट लोकशाहीर साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंती निमित्त महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघ, अकोट तालुका यांच्या वतीने शिव मंदिर सभागृह, कासोद-शिवपूर येथे आढावा बैठक उत्साहात संपन्न झाली.अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न द्यावा एकमताने ठराव बैठकीच्या सुरुवातीला लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार प्रदान करावा असा प्रस्ताव केंद्रीय सहसचिव अविनाश राठोड यांनी मांडला त्यांच्या ह्या प्रस्थावाला एकमताने ठराव मंजूर करण्यात आला.लवकरच यासंदर्भात राष्ट्रपती,पंतप्रधान,मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात येणार असल्याचे राज्य अध्यक्ष गजानन वाघमारे यांच्या वतीने सांगण्यात आले.विदर्भ मेळावा व राज्यस्तरीय अधिवेशनावर चर्चा बैठकीच्या अध्यक्षस्थानी राज्याध्यक्ष गजानन वाघमारे हे होते.प्रमुख अतिथी म्हणून राज्य सचिव राजेश डांगटे, राज्य सहसचिव अविनाश राठोड, प्रदेश प्रवक्ता अनंत गावंडे, राज्य निमंत्रक गोपाल चव्हाण उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून विभागीय उपाध्यक्ष अहेमद शेख, विभागीय समन्वयक कमलेश राठी, जिल्हाध्यक्ष अॅड. नरेंद्र बेलसरे उपस्थित होते.बैठकीत दि.१६ ऑगस्ट २०२६ रोजी चंद्रपूर येथे होणाऱ्या विदर्भ मेळाव्याच्या नियोजना बाबत सविस्तर चर्चा झाली आणि जबाबदाऱ्यांचे वाटप करण्यात आले.याच वर्षी ग्रामीण पत्रकार संघटनेचे राज्यस्तरीय अधिवेशन शेगाव येथे मोठ्या थाटामाटात आयोजित करण्यात येईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा राज्याध्यक्ष गजानन वाघमारे यांनी केली. यासाठीच ही आढावा बैठक आयोजित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.नवीन नियुक्त्या आणि सन्मान या बैठकीत ग्रामीण पत्रकार संघटनेत अकोट तालुका व जिल्ह्यातील नवीन सदस्यांना नियुक्ती देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.तसेच अकोट तालुक्याच्या उल्लेखनीय कार्याबद्दल तालुकाध्यक्ष नरेंद्र कोंडे यांचा केंद्रीय कार्यकारिणीच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला.या बैठकीला विभागातील पदाधिकारी, अकोला जिल्हा पदाधिकारी, अकोट व तेल्हारा तालुक्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते.जिल्हा सचिव डॉ. संतोष ताकोते, जिल्हा उपाध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार मनोहर गोलाईत, प्रकाश आम्ले यांच्यासह काशीनाथ कोंडे, गोवर्धन चव्हाण, पवन बेलसरे, विठ्ठल येवोकार, अरुण काकड, देवानंद आग्रे, निलेश झाडे, सोनू पाचडे, अश्विन पागृत, शरद भेंडे, दत्तात्रय भगत, वैभव गुजरकर, पूर्णाजी खोडके, विनोद सगणे, लालसिंग अडाणी, सोनू इंगळे, दीपक दाभाडे, जुनेद बेग, सैय्यद अहमद, शाम महाजन, तुषार सावरकर आदी उपस्थित होते.बैठकीचे आयोजन व प्रास्ताविक तालुकाध्यक्ष नरेंद्र कोंडे यांनी केले. सूत्रसंचालन धन्नू बायवार यांनी केले तर आभार प्रदर्शन राजेश सावीकार यांनी केले. स्नेहभोजनाने बैठकीचा समारोप झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *