
पुण्यतिथी महोत्सवाच्या आयोजन
देवानंद खिरकर अकोला जिल्हा प्रतिनिधी
संतश्री वासुदेवजी महाराज अर्थातच वैदर्भीय सर्व संप्रदायीक साधकांच्या मातोश्री चंद्रभागादेवी पुंडलिकरावजी पाटील जायले यांच्या पुण्यतिथी निमित्ताने सालाबाद प्रमाणे जो उत्सव महाराजांच्या हयातीत व पश्चात सुद्धा बरेच दिवस नित्यनेमाने श्री संत भास्कर महाराज संस्थान भास्कर नगर आडगाव बुद्रुक या ठिकाणी संपन्न होत होता.परंतु कोरोना कालखंडामध्ये तो शासकीय नियमानुसार बंद पडला असतांना काही निष्ठावंत गुरु भक्तांच्या माध्यमातून श्रींचे कुलोत्पन्न श्रीयुत अशोक महाराज जायले यांच्या कुशलनेतृत्वात प्रथम काहीकाळ छोटेखानी स्वरूपाचा श्री वैष्णव ज्ञान मंदिर वडाळी सटवाई या ठिकाणी अखंडपणे चालू ठेवल्या गेला.आणि गतकाहीवर्षी पासून तो सार्वजनिक स्वरूपात आयोजित करण्यात येतो आहे.याहीवर्षी आषाढ वद्य अष्टमी दि. ६ l ८ l २०२६ गुरुवार रोजी सकाळी प्रथम ‘श्रींच्या’ मूर्तीचा यजमानांच्या हस्ते विधिपूर्वक षोडशोपचारे अभिषेक होऊन १० ते १२ यावेळी भागवताचार्य श्री ज्ञानेश्वर महाराज वाघ त्यांचे हरिकीर्तन होऊन, तद्नंतर पारंपारिक भव्य महाप्रसादाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.तरी छपन्न वर्षाची पुरातन परंपरा असणाऱ्या उपरोक्त कार्यक्रमाकरिता पंचक्रोशीतील संपूर्ण श्रीगुरु भक्तांनी उपस्थित राहून श्रींच्या मातोश्रींच्या चरणकमली आपले श्रद्धा सुमन समर्पित करण्याचे आवाहन श्री संत भास्कर महाराज भक्त मंडळ अकोट यांनी केले आहे.
