पुंडा गावातील दलित वस्तीत विकासाचा ‘चिखल,पथदिवे बंद अन् रस्त्यांवर पाण्याचे डबके,ग्रामपंचायत प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष

पुंडा गावातील दलित वस्तीत विकासाचा ‘चिखल,पथदिवे बंद अन् रस्त्यांवर पाण्याचे डबके,ग्रामपंचायत प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष

देवानंद खिरकर अकोला जिल्हा प्रतिनिधी

स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाच्या उदासीनतेमुळे पुंडा गावातील दलित वस्तीला सध्या समस्यांच्या विळख्याला सामोरे जावे लागत आहे. पावसाळ्याच्या दिवसांत येथील अंतर्गत रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाली असून, संपूर्ण वस्तीत चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. रस्त्यांवर ठिकठिकाणी पाण्याचे मोठे डबके साचल्याने नागरिकांना आरोग्याचा आणि सुरक्षेचा मोठा धोका निर्माण झाला आहे.मुख्य समस्या आणि सद्यस्थिती चिखलमय रस्ते आणि पाण्याचे डबके चित्रात स्पष्ट दिसत असल्याप्रमाणे, वस्तीतील मुख्य रस्त्याला खड्ड्यांमुळे डबक्याचे स्वरूप आले आहे. पावसाचे पाणी आणि चिखल एकत्र झाल्याने लहान मुले, वृद्ध आणि महिलांना या चिखलातूनच कसरत करत वाट काढावी लागत आहे. चिखलामुळे पादचाऱ्यांचे पाय घसरून पडण्याचे प्रमाण वाढले आहे.पथदिवे बंद असल्याने अंधाराचे साम्राज्य वस्तीतील सार्वजनिक पथदिवे गेल्या अनेक दिवसांपासून बंद अवस्थेत आहेत.रात्रीच्या वेळी संपूर्ण परिसरात कमालीचा अंधार असतो.एकीकडे रस्त्यावर चिखल आणि पाण्याचे डबके, तर दुसरीकडे रात्रीचा अंधार यामुळे विषारी सरपटणारे प्राणी निघण्याची भीती नागरिकांमधून व्यक्त होत आहे.आरोग्याचा गंभीर प्रश्न रस्त्यांवर दिवसेंदिवस साचून राहत असलेल्या घाण पाण्यामुळे डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होत आहे. यामुळे डेंग्यू, मलेरिया आणि चिकुनगुनिया यांसारख्या साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव वाढण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.ग्रामपंचायतीचे अक्षम्य दुर्लक्ष या गंभीर समस्येबाबत वस्तीतील नागरिकांनी अनेकदा स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाकडे तोंडी व लेखी तक्रारी केल्या आहेत.परंतु प्रशासनाकडून केवळ आश्वासनापलीकडे कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही.दलित वस्तीच्या या मूलभूत प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा संतप्त आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे.*प्रतिक्रिया*ग्रामपंचायत प्रशासनाने तात्काळ या समस्येची दखल घेऊन रस्त्यावरील पाण्याचा निचरा करावा, चिखलावर मुरूम किंवा खडी टाकावी आणि बंद असलेले पथदिवे त्वरित सुरू करावेत.निर्मला चव्हाण महिला नागरिक *प्रतिक्रिया*अनेक दिवसापासून पथदिवे बंद आहेत जंगली जनावरे साप यांचा वावर आहे पाणी थांबत असल्या मुळे डासांचा मोठ्या प्रमाणात आहेत ग्रामपंचायत प्रशासनाने आमचा जीवाशी खेळ लावला आहेइंदिरा पवारमहिला नागरिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *