
नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ द्या बोर्डीसह परिसरातील शेतकऱ्यांची मागणी,मुख्यमंत्र्यांना निवेदन
देवानंद खिरकर अकोला जिल्हा प्रतिनिधी
अकोट तालुक्यातील बोर्डीसह परिसरातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ द्या.अशी आग्रही मागणी शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजने मधील नियमित कर्जाची परतूफेड करून सर्व सेवा सहकारी सोसायट्या नियमीत कार्यरत ठेवणारे सर्व शेतकरी बांधवांना पूर्ण कर्जमाफी कींवा दोन लाख रुपये माफी करण्यात यावी.या बाबत निवेदन देण्यात आले आहे.आज पर्यंत झालेल्या सर्व कर्जमाफीमध्ये नियमित कर्ज पुरवठा परतफेड करणाऱ्या सर्व शेतकयांना त्या त्या वेळच्या शासनाने अन्याय केलेला आहे.त्याचप्रमाणे आपल्या शासनाकडून सुद्धा तुटपुंजी प्रोत्साहन पर मदत जाहीर केली.वास्तविक पाहता नियमित कर्ज पुरवठा भरणाऱ्या शेतकयांना पूर्ण कर्जमाफी द्यायला पाहिजे.राज्यातील शेती व्यवसायाशी कर्ज पुरवठ्या बाबतीत राष्ट्रीयकृत बँका,जिल्हा बँक व सेवा सहकारी सोसायटी निगडीत आहेत यामध्ये सर्व लहान मोठे अल्प अत्यल्पभूधारक सर्व शेतकरी हे सेवा सहकारी सोसायटी मधून नर्ज पुरवठा घेतात.अशा शेती व्यवसायाशी निगडित सर्व सेवा सहकारी सोसायटी नियमित कार्यरत राहणे हे शेतकयांच्या दृष्टीने गरजेचे आहे.ह्या सर्व सेवा सहकारी सोसायटी नियमित कर्ज पुरवठा भरणाऱ्या शेतकयांच्या भरोशावर नियमित कार्यरत आहेत.नियमितपणे कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना कर्ज भरतेवेळी पैशाची जुळवाजुळव करण्यामध्ये काय काय कसरत करावी लागते हे त्यांचे त्यांनाच माहित आहे.अशा सर्व शेतक-यांवर कर्जमाफीमध्ये शासनाकडून वेळोवेळी झालेल्या कर्जमाफीत सावत्र वागणूक मिळत आहे.यामुळे हे सर्व शेतकरी चांगलेच खचून गेलेले आहे.सहकार क्षेत्राचा पाया असणाऱ्या सर्व सेवा सहकारी सोसायट्या कार्यरत ठेवण्याकरिता नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी द्या.अथवा दोन लाख रुपये प्रोत्साहन पर देण्यात यावे.बँक आणि सेवा सहकारी सोसायटीमध्ये शेतकयांची पत कायम ठेवावी.या बाबत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना बोर्डीसह परिसरातील शेतकऱ्यांनी निवेदन देऊन आग्रही मागणी करण्यात आली आहे. सदर निवेदनवर देविदास बुले,गजानन डाफे,राजेश मनोहर फुंडकर,धीरज हिंगणकर,बाळासाहेब बोंद्रे,यांच्यासह परिसरातील शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.
