रऊफ बेग यांच्या सेवा पूर्तीनिमित्त सत्कार

रऊफ बेग यांच्या सेवा पूर्तीनिमित्त सत्कार

वाशीम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव)

अखिल महाराष्ट्र उर्दू शिक्षक संघटना, जिल्हा वाशिम यांच्या वतीने जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक उर्दू कन्या शाळा, शिरपूर येथे अ. रऊफ बेग यांच्या 33 वर्षांच्या गौरवशाली शैक्षणिक सेवेच्या पूर्तीनिमित्त सेवानिवृत्ती सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात व अत्यंत भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सय्यद अय्यूब यांनी भूषविले. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन हैदर खान यांनी केले.या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षक पतसंस्थेचे अध्यक्ष विजय मनवर , शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष विनोद घुगे , शिक्षक पतपेढीचे संचालकसतीश सांगळे , सतीश घुगे, राजू इंगळे, सानप , प्रशांत वाजुळकर तसेच नागेश कवर उपस्थित होते. उपस्थित सर्व मान्यवरांनी आदरणीय अ. रऊफ बेग सर यांच्या 33 वर्षांच्या निस्वार्थ, प्रामाणिक व समर्पित शैक्षणिक सेवेचा गौरव करत त्यांच्या कार्याचा, विद्यार्थ्यांप्रती असलेल्या प्रेमाचा, सहकारी शिक्षकांशी असलेल्या जिव्हाळ्याच्या नात्याचा व समाजाप्रती असलेल्या योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख करून त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या._यावेळी अखिल महाराष्ट्र उर्दू शिक्षक संघटना, जिल्हा वाशीमचे जिल्हाध्यक्ष मोहम्मद इलिया _यांनीही रऊफ बेग यांच्या कार्यशैली, नेतृत्वगुण, साधेपणा आणि संघटनेप्रती असलेल्या योगदानाबद्दल मनोगत व्यक्त करून त्यांच्या पुढील निरोगी, आनंदी व यशस्वी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या._ या कार्यक्रमात जिल्हा परिषद उर्दू कन्या शाळा, शिरपूर येथे नव्याने रुजू झालेले मुजफ्फर व मेहबूब यांचे पुष्पगुच्छ देऊन मनःपूर्वक स्वागत करण्यात आले. तसेच तारीक यांची राजकीय शाळेत समायोजनाद्वारे बदली झाल्याने त्यांना भावपूर्ण निरोप देण्यात आला. कार्यक्रमात आणखी एक आनंदाचा क्षण म्हणजे बर्थडे बॉय सफुर यांचा वाढदिवस सर्वांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला. उपस्थितांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या उत्तम आरोग्य व दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. कार्यक्रमाच्या शेवटी अखिल महाराष्ट्र उर्दू शिक्षक संघटना, जिल्हा वाशिमचे जिल्हाध्यक्ष मोहम्मद इलियास यांनी उपस्थित सर्व मान्यवर, शिक्षक, मुख्याध्यापक व कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले. अध्यक्षांच्या परवानगीने कार्यक्रम संपन्न झाला असे घोषित केले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी असदखान , सादिक , कलीम , हैदर खान , फहिम ,एजाज , शाहिद , व इतर सर्वांनी भरपूर योगदान दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *