दहीहंडा पोलीसांची हेल्मेट सक्ती मोहीम सुरू पहिल्याच दिवशी ५५ वाहनचालकांवर कारवाई

दहीहंडा पोलीसांची हेल्मेट सक्ती मोहीम सुरू पहिल्याच दिवशी ५५ वाहनचालकांवर कारवाई

अकोला जिल्हा प्रतिनिधी देवानंद खिरकर

अकोला जिल्ह्यात रस्ते अपघातांमध्ये होणारी जीवितहानी कमी करण्यासाठी पोलीस प्रशासनाने हेल्मेट सक्तीची मोहीम अधिक कडक केली आहे.जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या आदेशानुसार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी निखिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दहीहंडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार गोपाल ढोले यांच्या नेतृत्वात १ ऑगस्टपासून हेल्मेट सक्तीची विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे.या मोहिमे अंतर्गत दहीहंडा पोलीस स्टेशन हद्दीत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यात येत आहे.वाहतूक शाखेचे कर्मचारी मानकर,दहिकर,यांनी विशेष तपासणी मोहीम राबवून पहिल्याच दिवशी हेल्मेट न वापरणाऱ्या ५५ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली.या मोहिमेचा उद्देश केवळ दंडात्मक कारवाई करणे नसून नागरिकांमध्ये वाहतूक नियमांविषयी जनजागृती करणे आणि अपघातांमध्ये होणारी जीवितहानी टाळणे हा आहे.यावेळी ठाणेदार गोपाल ढोले यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की स्वतःच्या आणि कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येक दुचाकीस्वाराने हेल्मेटचा नियमित वापर करावा.वाहतूक नियमांचे पालन करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे.पोलीस प्रशासनाने ही विशेष मोहीम पुढील काळातही सातत्याने सुरू राहणार असल्याचे स्पष्ट केले असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *