प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या नोंदणीसाठी तातडीने मुदतवाढ द्यावी – आमदार रणधीर सावरकर यांची शासनाकडे मागणी

प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या नोंदणीसाठी तातडीने मुदतवाढ द्यावी – आमदार रणधीर सावरकर यांची शासनाकडे मागणी

तेल्हारा प्रतिनिधी बाळासाहेब नेरकर

अकोला, दि. 31 जुलै 2026 : अकोला जिल्ह्यात अद्यापही मोठ्या संख्येने शेतकऱ्यांची *प्रधानमंत्री पीक विमा योजना* नोंदणी बाकी आहे. योजनेची अंतिम तारीख आज *दि. 31 जुलै 2026* आहे. ही मुदत वाढवणे अत्यंत आवश्यक आहे, या मागणीसाठी *आमदार श्री रणधीर सावरकर* यांनी राज्याचे *मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस* तसेच *कृषिमंत्री श्री दत्तात्रय भरणे* यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून तातडीने विनंती केली आहे.आमदार सावरकर यांनी यापूर्वी देखील शासनाला पत्राद्वारे मुदतवाढ देण्याची विनंती केली होती. शासनाने यावर्षी खरीप हंगामासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेची अंतिम मुदत *31 जुलै 2026* निश्चित केली आहे. परंतु पीक विम्यासाठी बंधनकारक असलेली *ॲग्रीस्टॅक नोंदणी* अजूनही अनेक शेतकऱ्यांनी केलेली नाही.*तांत्रिक अडचणी, बँका/CSC केंद्रांवरील गर्दी, लांबलेली पेरणी* अशा अनेक कारणांमुळे शेतकऱ्यांना वेळेत अर्ज करता आलेला नाही. त्यामुळे अर्जासाठी मुदतवाढ मिळावी अशी शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री पीक विमा योजनेची मुदत तातडीने वाढवण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती आमदार सावरकर यांनी शासनास केली आहे.सतत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सभागृहात आणि सभागृहाबाहेर पाठपुरावा करून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आमदार सावरकर प्रयत्नशील असतात. त्यांच्या पाठपुराव्यामुळे महसूल विभाग आणि कृषी विभागाने अनेक चांगले निर्णय घेतले आहेत. शेतकऱ्याला केंद्रबिंदू मानून ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करणे, हेच *महात्मा गांधी, पंडित दीनदयाळ उपाध्याय आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर* यांचे स्वप्न आहे.एक हाडाचा शेतकरी आणि अभियंता असले *आमदार रणधीर सावरकर* यांनी पुन्हा एकदा सक्रियता दाखवली आहे. पीक विम्याची मुदत वाढवण्यासाठी त्यांनी *खासदार श्री अनुप धोत्रे* यांच्या माध्यमातून केंद्र सरकारकडेही पाठपुरावा सुरू केला आहे. तसेच मुख्यमंत्री आणि कृषिमंत्र्यांना फोन, पत्र आणि ई-मेलद्वारे विनंती करून शेतकऱ्यांना दिलासा मिळवून देण्याचा प्रयत्न सुरू आहे.—*🌾 महत्त्वाची सूचना – शेतकऱ्यांसाठी 🌾* प्रधानमंत्री पीक विमा योजनेची अंतिम तारीख *31 जुलै 2026*. अकोला जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांची नोंदणी अद्याप बाकी.*आ. रणधीर सावरकर* यांनी मुख्यमंत्री *देवेंद्र फडणवीस* व कृषिमंत्री *दत्तात्रय भरणे* यांच्याकडे तातडीने मुदतवाढीची मागणी केली. *खा. अनुप धोत्रे* यांच्यामार्फत केंद्राकडेही पाठपुरावा सुरू.*कारणे:* ॲग्रीस्टॅक नोंदणी बाकी, बँक/CSC वर गर्दी, लांबलेली पेरणी. *मागणी:* शेतकऱ्यांना अर्जासाठी पुरेशी मुदत मिळावी.—

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *