
जळगाव जामोद तालुक्यात मुसळधार पावसाचा कहर; सर्व शाळांना आज सुटी जाहीर
जळगाव जामोद तालुका प्रतिनिधी सुरेंद्र गवई
जळगाव जामोद तालुक्यात काल रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला असून अनेक ठिकाणी पावसाचे पाणी घरांमध्ये व रस्त्यांवर शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.या पार्श्वभूमीवर मा. जिल्हाधिकारी आणि मा. शिक्षणाधिकारी यांच्या निर्देशानुसार जळगाव जामोद तालुक्यातील सर्व शाळांना आज सुटी जाहीर करण्यात आली आहे.📌 प्रशासनाच्या महत्त्वाच्या सूचना :ज्या शाळांमध्ये विद्यार्थी उपस्थित आहेत, त्या विद्यार्थ्यांच्या पालकांशी तात्काळ संपर्क साधावा.सर्व विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे त्यांच्या घरी पोहोचविण्याची जबाबदारी मुख्याध्यापक व वर्गशिक्षकांनी पार पाडावी.सर्व विद्यार्थी सुखरूप घरी पोहोचल्याची खात्री झाल्यानंतरच मुख्याध्यापक व शिक्षकांनी मुख्यालय सोडावे.⚠️ नागरिकांना आवाहन : अनावश्यक घराबाहेर पडू नका. नदी-नाले, पूल व पाण्याने भरलेल्या रस्त्यांपासून दूर राहा. प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सुरक्षित राहा
