वाकळवाडी येथे व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू पत्नीसह चार झन पोलिसांच्या ताब्यात, तपास सुरू

वाकळवाडी येथे व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू; पत्नीसह चार झन पोलिसांच्या ताब्यात, तपास सुरू

वाशीम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव)

तालुक्यातील अमानी येथील रहिवासी सुरेश झळके यांचा वाकळवाडी शिवारात संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. सुरेश झळके हे पत्नीसोबत वाकळवाडी येथे सासरवाडीत आले होते.मिळालेल्या माहितीनुसार, वाकळवाडी गावापासून काही अंतरावर जंगल परिसरातील ज्ञानदेव चोडकर यांच्या शेतात एका लिंबाच्या झाडाखाली त्यांच्यावर घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला जात असून, या घटनेत त्यांचा मृत्यू झाला.घटनेची माहिती मिळताच मेडशी पोलिस चौकीचे जमादार विनोद इंगळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली.त्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी पवार तसेच मालेगाव पोलिस ठाण्याचे ठाणेदार राजेश खेरडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणात पोलिसांनी मृताच्या पत्नीसह आणखी तीन व्यक्तींना चौकशीसाठी ताब्यात घेतले असून, पुढील तपास मालेगाव पोलिस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *