लहान उमरीच्या संत रोहिदास महाराज मंदिरात गुरुपौर्णिमेनिमित्त भव्य दीपोत्सव – भाजप कार्यकर्त्यांचा सहभाग

लहान उमरीच्या संत रोहिदास महाराज मंदिरात गुरुपौर्णिमेनिमित्त भव्य दीपोत्सव – भाजप कार्यकर्त्यांचा सहभाग

तेल्हारा प्रतिनिधी बाळासाहेब नेरकर

अकोला/तेल्हारा, दि. 29 जुलै 2026 बाळासाहेब नेरकरगुरुपौर्णिमा आणि संत शिरोमणी रोहिदास महाराज जयंतीच्या पवित्र प्रसंगी अकोल्यातील लहान उमरी येथील संत रोहिदास महाराज मंदिरात दीपोत्सव मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा करण्यात आला. मंदिर परिसर दीपांच्या रोषणाईने उजळून निघाला होता. या दीपोत्सवात समाजातील विविध घटकांनी सहभाग घेतला. यावेळी *जयंतराव मसने, पंकज सावळे, किशोर काकडे, शिवलाल इंगळे, परिमल कांबळे, मनीष भाऊ गावंडे, संतोष उंबरकर, योगेश इंगळे, ऋषिकेश घुईकर, नवीन भदे, संदीप भटकर, प्रतीक मसने, संदीप शेगोकार, अक्षय डांगे, सचिन वाढोकर, अजय चोपडे, दीपक गवई, दीपक इंगळे, नरेंद्र दिंडोकार, विठ्ठल उंबरकर यांच्यासह मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्ते, ग्रामस्थ व महिला-पुरुष उपस्थित होते.सर्वांनी एकत्रितपणे दीप प्रज्वलन करून संत रोहिदास महाराजांच्या विचारांना वंदन केले. यावेळी भजन, कीर्तन आणि प्रसाद वाटपाचा कार्यक्रमही पार पडला. संत रोहिदास महाराजांच्या “माणूस माणसाला माणूस म्हणून जगू द्या” या विचारांचा प्रसार करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *