धाडसी आणि कर्तव्यनिष्ठ अधिकाऱ्याची नवी जबाबदारी सचिन बागुल यांची पोलीस निरीक्षकपदी नियुक्ती

धाडसी आणि कर्तव्यनिष्ठ अधिकाऱ्याची नवी जबाबदारी; सचिन बागुल यांची पोलीस निरीक्षकपदी नियुक्ती

जळगाव जामोद तालुका प्रतिनिधी सुरेंद्र गवई

जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक म्हणून प्रभावी कामगिरी बजावणारे सचिन बागुल यांची जळगाव जामोद पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी जिल्ह्यातील आठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या केल्या असून त्यामध्ये सचिन बागुल यांचीही जळगाव जामोद येथे नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे शहर व तालुक्यामध्ये कायदा व सुव्यवस्था आणखी बळकट होईल,असा विश्वास व्यक्त केला जात आहे.प्रभारी पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असताना सचिन बागुल यांनी अवैध धंद्यांवर सातत्याने कारवाई, गुन्हे उघडकीस आणणे,फरार आरोपींना अटक करणे,मंदिर चोरीसारख्या जुन्या गुन्ह्यांचा छडा लावणे तसेच जुगार,अवैध व्यवसाय आणि गुन्हेगारी प्रवृत्तीवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी उल्लेखनीय कामगिरी केली.त्यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी अनेक यशस्वी मोहिमा राबवून नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण केली.सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारी तत्परतेने ऐकून घेणे, लोकाभिमुख कामाला प्राधान्य देणे आणि गुन्हेगारीविरोधात कठोर भूमिका घेणे, ही त्यांची कार्यपद्धती विशेष ठरली आहे.त्यामुळे त्यांच्या नियमित नियुक्तीचे शहरातील विविध स्तरांतून व्यापारी, सामाजिक संघटना कडून त्यांचे स्वागत होत आहे.सचिन बागुल यांच्या नेतृत्वाखाली जळगाव जामोद पोलीस ठाण्याची कामगिरी अधिक प्रभावी होईल आणि गुन्हेगारीवर अधिक प्रभावी नियंत्रण मिळवून नागरिकांना सुरक्षित वातावरण उपलब्ध होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *