
पराक्रम दिनानिमित्त राज्यस्तरीय निबंध, वक्तृत्व व रिल्स स्पर्धांचे आयोजन१ ते १५ ऑगस्टदरम्यान होणार स्पर्धा; राज्यातील विद्यार्थी व नागरिकांना सहभागाचे आवाहन
वाशिम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव).
३० : महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्था महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), पुणे यांच्या वतीने श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या जयंतीनिमित्त १८ ऑगस्ट हा दिवस ‘पराक्रम दिन’ म्हणून राज्यभर साजरा करण्यात येत आहे. यानिमित्ताने १ ते १५ ऑगस्ट २०२६ या कालावधीत राज्यस्तरीय निबंध, वक्तृत्व आणि रिल्स स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून राज्यातील विद्यार्थी व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन अमृत संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांनी केले आहे.श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या शौर्य, पराक्रम, राष्ट्रनिष्ठा, युद्धकौशल्य आणि नेतृत्वगुणांची माहिती नव्या पिढीपर्यंत पोहोचावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमासाठी अमृत संस्थेमार्फत स्थापन करण्यात आलेल्या’पराक्रम दिन समिती’ मध्ये ज्येष्ठ इतिहास अभ्यासक काकासाहेब विधाते, पांडुरंग बलकवडे, जगन्नाथ लडकत, मोहन शेटे, मंगेश खाडिलकर आणि सौ. कौमुदी परांजपे यांचा समावेश आहे.राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये शालेय, महाविद्यालयीन आणि खुल्या गटातील स्पर्धकांना सहभाग घेता येणार आहे. निबंध स्पर्धेत मराठी, हिंदी किंवा इंग्रजी भाषेतील १,००० शब्दांपर्यंतचा निबंध PDF स्वरूपात सादर करावा लागेल. वक्तृत्व स्पर्धेसाठी १० मिनिटांपर्यंतचा स्वभाषणाचा व्हिडिओ, तर रिल्स स्पर्धेसाठी ३ मिनिटांपर्यंतची रील सादर करावी लागणार आहे.स्पर्धांसाठी ‘१८ व्या शतकातील हिंदवी साम्राज्य विस्तारक थोरले बाजीराव पेशवे’, ‘अपराजित योद्धे’, ‘संघटन कौशल्य’, ‘युद्धनीती’, ‘स्वामीनिष्ठा’, ‘दिल्लीची मोहीम’, ‘बुंदेलखंड व छत्रसालचे रक्षणकर्ते’ तसेच ‘जगप्रसिद्ध पालखेड विजय’ हे विषय निश्चित करण्यात आले आहेत.स्पर्धा १ ते १५ ऑगस्ट या कालावधीत होणार असून प्रवेशिका सादर करण्याची अंतिम मुदत १५ ऑगस्ट २०२६ आहे. स्पर्धेचे स्वरूप, नियमावली, बक्षिसे, संदर्भ पुस्तके आणि ई-बुक पराक्रम दिनच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अधिकाधिक विद्यार्थी, शिक्षक, इतिहास अभ्यासक आणि नागरिकांनी या राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांनी केले आहे.माहितीचा बॉक्स ‘पराक्रम दिन’ स्पर्धा : एका नजरेत🔹 स्पर्धा कालावधी : १ ते १५ ऑगस्ट २०२६🔹 प्रवेशिका सादर करण्याची अंतिम मुदत : १५ ऑगस्ट २०२६🔹 स्पर्धांचे प्रकार :• निबंध स्पर्धा• वक्तृत्व स्पर्धा• रिल्स स्पर्धा🔹 सहभागी गट :• शालेय• महाविद्यालयीन• खुला गट🔹 स्पर्धेचे प्रमुख विषय :• अपराजित योद्धे – थोरले बाजीराव पेशवे• थोरल्या बाजीरावांची युद्धनीती• दिल्लीची मोहीम• पालखेड विजय• संघटन कौशल्य• स्वामीनिष्ठा🔹 अधिक माहितीसाठी :पराक्रम दिन अधिकृत संकेतस्थळ :https://parakramdin.mahaamrut.org.inस्पर्धेचे आकर्षण✔ राज्यस्तरीय स्पर्धा✔ मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेत सहभागाची संधी✔ शालेय, महाविद्यालयीन व खुल्या गटासाठी स्वतंत्र स्पर्धा✔ इतिहासाची ओळख आणि सर्जनशीलतेला वाव
