अकोट मध्ये तुकडोजी महाराज चरण पादुका पालखी पुजन सोहळा ६ ऑगस्टला भजन,मिरवणूक,किर्तन आणि महाप्रसादाचे आयोजन

अकोट मध्ये तुकडोजी महाराज चरण पादुका पालखी पुजन सोहळा ६ ऑगस्टला भजन,मिरवणूक,किर्तन आणि महाप्रसादाचे आयोजन

अकोला जिल्हा प्रतिनिधी देवानंद खिरकर

अकोट श्री गुरुदेवांच्या चरण पादुकांच्या पालखी पुजन सोहळ्याचे आयोजन येत्या गुरुवार दि. ६ ऑगस्ट २०२६ रोजी अकोट येथे करण्यात आले आहे.समस्त मुंडगांवकर परिवार व श्री गुरुदेव भक्त परिवार अकोट यांच्या वतीने हा सोहळा श्री नरसिंग महाराज मंदिर सभागृहात साजरा होणार आहे.सकाळी ९ वाजता भजन सम्मेलनाने कार्यक्रमाला सुरुवात होईल.सकाळी १० वाजता केंद्रीय कार्यकारनी सचिव रवींद्र मुंडगांवकर यांच्या निवासस्थानी चरण पादुकांचे आगमन व पुजन करण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी १०.३० वाजता चरण पादुकांची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे.सकाळी ११ वाजता श्री नरसिंग महाराज सभागृहात मुंडगांवकर परिवार व सर्व गुरुदेव भक्तांच्या उपस्थितीत पालखीचे सामुहिक पुजन होणार आहे.यावेळी पालखी सोबत आलेल्या गोपाल कडू,प्रचार हीप्रमुख व वारकरी मंडळींचा सत्कार सोहळा सकाळी ११ ते १.३० दरम्यान संपन्न होईल.कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणून सकाळी ११.३० ते १.३० या वेळेत ह.भ.प.श्री.लक्ष्मणदास काळे महाराज यांचे श्रीहरी किर्तन होणार आहे.दुपारी १.३० वाजता आरती,गोपाळकाला व महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता होईल. या कार्यक्रमासाठी प्रमोद मुंडगावकर,अनिल मुंडगावकर,सचिन भुस्कट शुकदास महाराज गाडेकर शिवाजी म्हैसने,दिनेश बोचे,पंकज मुंडगावकर या सर्वांची उपस्थिती राहणार असून या सोहळ्याला आकोट व परिसरातील सर्व गुरुदेव भक्तांनी हजर राहण्याचे आव्हान तालुका प्रचारक राज सुदन कुलट यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *