भर पावसातही प्रभाग क्रमांक १२ मध्ये टँकरने पाणीपुरवठा पाईपलाईन फुटल्याने नागरिकांचे हाल

भर पावसातही प्रभाग क्रमांक १२ मध्ये टँकरने पाणीपुरवठा पाईपलाईन फुटल्याने नागरिकांचे हाल

देवानंद खिरकर अकोला जिल्हा प्रतिनिधी

अकोट नगर परिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक १२ मध्ये भर पावसातही नागरिकांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे.एअरटेल कंपनीने केबल टाकण्यासाठी केलेल्या खोदकामादरम्यान पाणीपुरवठ्याची मुख्य पाईपलाईन फुटल्याने परिसरातील जलपुरवठा विस्कळीत झाला असून नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.या गंभीर समस्येबाबत नागरिकांनी नगर परिषद प्रशासनाकडे पाणीपुरवठा तातडीने सुरळीत करण्याची मागणी केली.मात्र प्रशासनाकडून समाधानकारक प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.अखेर स्थानिक नगरसेवकांनी स्वखर्चाने ट्रॅक्टर व टँकरची व्यवस्था करून नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिल्याने काहीसा दिलासा मिळाला.दरम्यान या घटनेमुळे नगर परिषद प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.सत्ताधारी नगरसेवकही नगर परिषद प्रशासनासमोर हतबल तसेच,अकोट नगर परिषदेचा पाणीपुरवठा करणारा टँकर ट्रॅक्टर बॅटरी नसल्यामुळे बंद असल्याची चर्चा शहरात रंगत आहे.पाईपलाईनची तातडीने दुरुस्ती करून नियमित पाणीपुरवठा पूर्ववत करावा.अशी मागणी प्रभाग क्रमांक १२ मधील नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *