सहा.पोलीस अधीक्षक अकोट यांची गुटख्यावर धडक कार्यवाही१७,५४,२०४/- रू. चे गुटख्यासह वाहन जप्त

सहा.पोलीस अधीक्षक अकोट यांची गुटख्यावर धडक कार्यवाही१७,५४,२०४/- रू. चे गुटख्यासह वाहन जप्त

अकोला जिल्हा प्रतिनिधी देवानंद खिरकर

दिनांक २९/७/२०२१ रोजी रात्री ०९/१५ वा. चे सुमारास सहा.पोलीस अधीक्षक निखील पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की एका पांढ-या रंगाच्या बोलेरो पिक अप गाडीमधुन अकोट कडुन दर्यापुर रोडने शासन प्रतिबंधक पानमसाला (गुटखा) सुगंधीत तंबाखूची वाहतूक होणार आहे.अशा खात्रीलायक बातमीवरून सहा पोलीस अधीक्षक अकोट यांनी त्यांने कार्यालयातील वाचक फौजदार शाम बुंदेले व पोलीस अंमलदारांना सदर वाहनावर रेड करण्याबाबत आदेशीत केले असता पोउपनि शाम बुंदेले,कार्यालयातील पोलीस कर्मचारी व आर.सी.पी.अंमलदारांनी दोन पंचांसह दर्यापुर रोडवरील कोल्हे हॉस्पीटलजवळ नाकाबंदी केली असता अकोला नाक्यावरील पुलावरून एक पांढ-या रंगाचा बोलेरो पिक दर्यापुर रोडने येतांना दिसल्याने सदर वाहनास पंचांसमक्ष थांवण्याचा इशारा केल्यावर वाहन चालकाने वाहन थांबविले व त्यास संशय आल्याने सदर वाहनावरील वाहन चालक अंधाराचा फायदा घेवुन पळुन गेला. यानंतर सदर वाहनाची पंचांसमक्ष झडती घेतली असता सदर वाहनामध्ये वाह, विमल, पान पराग, पान बहार कंपनीचा प्रतिबंधक पानमसाला व सुंगधीत तंबाखु एकुण किंमत १७,५४,२०४/- रूपयांचा मिळुन आल्याने सदरचा प्रतिबंधक पानमसाल व सुंगधीत तंबाखु तसेच बोलेरो पिक वाहन कमांक एम.एच. १२ व्हि. एफ ८५९५ किंमत १२,००,०००/- रू असा एकुण २९,५४,२०४/- रूपयांचा मुददेमाल जप्त करून पोलीस स्टेशन अकोट शहर येथे आणुण सदर प्रकरणी पोउपनि शामकुमार बुंदेले यांचे रिपोर्टवरून अप क.६३४/२०२६ कलम १२३, २२३, २७४, २७४ भारतीय न्यायसंहीता सहकलम २६(१), २६(४),२७ (३) (डी), २७ (३) (ई), 219(2)(37) अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.सदर गुन्हयातील आरोपी ताब्यात असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहेसदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री. अर्चित चांडक, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. वी. चंद्रकांत रेड्डी, सहा. पोलीस अधीक्षक श्री. निखील पाटील यांचे मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय अकोट चे वाचक फौजदार शामकुमार बुंदेले, पोहेकॉ बजरंग इंगळे, पोहेकॉ अनिल सिरसाट, पोहेकॉ गोपाल निमकर्डे, पोकों अक्षय ढेपे तसेच आर.सी. पी. प्लाटुनचे अंमलदार पोकों रामेश्वर घंघाळ, राहुल ठाकुर, सै. चांद मुन्शी, राम अहीरकर यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *