
औरंगाबाद शेतशिवार मधील अर्धवट असलेला लाडेगांव रस्ताचे काम पुर्ण करा शेतकऱ्यांची मागणी,आ.प्रकाश भारसाकळे यांना निवेदन
अकोला जिल्हा प्रतिनिधी देवानंद खिरकर
अकोट ते बोर्डी रस्त्यावर ओरंगाबाद शेतशिवार,अंतर्गत लाडेगाव रस्ता सोळंके यांच्या शेतातील शिवमंदिर पर्यंत झाला आहे.पुढे या रस्त्याचे डांबरीकरण झालेले नाही.या रस्त्यावर परिणामी जागोजागी खड्डे पडले आहेत.शेतकरी यामधून जाता येतांना तारेवरची कसरत करत आपल्या शेतात जात आहेत.पूढे घोगा नाल्यावरील पुलाचे सुद्धा काम पुर्ण झालेले आहे.परंतु रस्ता पुर्ण झाला नाही.शेतकऱ्यांना वेळोवेळी या रस्त्याने आपला जीव मुठीत घेऊन जावे लागते.या समस्येबाबत या भागातील शेतकरी वर्गाने या विषयी बांधकाम विभाग जि,प.विभाग तसेच आमदार प्रकाश भारसाकळे यांना निवेदन देऊन हे काम पुर्ण करण्याची मागणी केली आहे.याप्रसंगी शेतकरी सुभाष नागापुरे,क्षितिज गोरले,श्याम भास्कर,सचिन नागापुरे,सचिन दातिर,शेखर नागापुरे,अनिलकुमार पिलातर,श्रीकृष्ण माकोडे,संतोष भावे,देवानंद केदार,सनी बोडखे, श्याम भावे, महादेव भावे, शिवदासभावे,शिवदास केदार,अक्षय नागापुरे,प्रमोद भगत यांच्यासह बहुसंख्य शेतकरी बांधव उपस्थित होते
