
महाक्षेत्र पंढरपूर येथील योग योगेश्वर भक्तनिवास भूमिपूजन सोहळा पार पडला
देवानंद खिरकर अकोला जिल्हा प्रतिनिधी
अकोट तालुक्यातील योग योगेश्वर भक्तनिवास भूमिपूजन सोहळा संपन्न झाला.ह भ प श्री शिवराम महाराज पवार , ह भ प श्री वासुदेवजी महाराज, परमहंस परशराम महाराज यांच्या कृपा प्रसादाने पंढरपूर येथे चंद्रभागा मातेच्या तीरावर वारकऱ्यांची मुक्कामाची व्यवस्था व्हावी या उदात्त हेतूने जागा घेण्यात आली व आषाढी वारीच्या पवित्र पर्व काळात अष्टमीला हा भूमिपूजन सोहळा पार पडला.यावेळी योग योगेश्वर संस्थान संत गजानन महाराजांच्या पादुकांचा अभिषेक करण्यात आला व उपस्थित संत मंडळींचा सत्कार वारकऱ्यांच्या हातून कारण्यात आला या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ श्रद्धासागर अकोट चे अध्यक्ष ह भ प श्री वासुदेव महाराज महल्ले होते कार्यक्रमाची प्रास्ताविक ह भ प श्री अरुण महाराज लांडे यांनी केले व कार्यक्रमाला विशेष उपस्थिती ह भ प श्री वासुदेव महाराज खोले गुरुजी संत शिवराम महाराज पवार दिंडी सोहळा,ह भ प श्री अशोक महाराज जायले संत भास्कर महाराज पालखी सोहळा प्रमुख , ह भ प श्री गजानन महाराज हीरुळकर संत गजानन महाराज पादुका संस्थान मुंडगाव पालखी सोहळा प्रमुख, ह भ प श्री मधुकर महाराज साबळे संत सोनाजी महाराज संस्थान सोनाळा पालखी सोहळा प्रमुख, ह भ प श्री नामदेव महाराज टापरे पूर्ण माता उगम स्थळ भजदई पालखी सोहळा प्रमुख, ह भ प श्री अवधूत महाराज पारस्कर योग योगेश्वर संस्थान वरुर जऊळका पालखी सोहळा, ह भ प श्री कुपटे महाराज ,ह भ प श्री मोहन महाराज मेतकर,ह भ प श्री ज्ञानेश्वर महाराज नावकार,ह.भ.प.श्री.रामदास महाराज जवंजाळ,ह.भ.प.श्री.गजानन महाराज ऐरोकर, सुनील राजगुरू आणि योग योगेश्वर संस्थान पूर्ण फक्त परिवार उपस्थित असुन गायक,वादक आणि मठातील सर्व वारकरी मंडळी या पवित्र कार्याला उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ह.भ.प.श्री.शिवहरी महाराज इस्तापे यांनी केले सर्व उपस्थित महाराज मंडळीचा हस्ते भूमिपूजन व बोर्डाचे अनावरण करण्यात आले.सर्व वारकऱ्यांना अप्लोहार करण्यात आला उपस्थित सर्व संत मंडळीचे आभार योग योगेश्वर भक्त निवास अध्यक्ष ह.भ.प.श्री गणेश महाराज शेटे यांनी मानले व पसायदाराने कार्यक्रमाचा समारोप झाला.
