
तालुक्यातील ५,६४७ शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा दिलासा!; सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय – सुरेश मुंढे…
वाशीम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव)
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने शेतकरी हिताला प्राधान्य देत पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी वेगाने सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यातील पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. मालेगाव तालुक्यातील तब्बल ५,६४७ सभासद शेतकऱ्यांचा त्यामध्ये समावेश झाला आहे. त्यामुळे तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाल्याची माहिती भाजपा तालुका अध्यक्ष सुरेश मुंढे यांनी दिली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी कर्जमुक्तीची प्रक्रिया पारदर्शक आणि गतीमान पद्धतीने सुरू केली आहे. या निर्णयामुळे थकबाकीदार व आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकरी कुटुंबांना मोठा आधार मिळणार असून,कृषी क्षेत्रालाही बळकटी मिळणार आहे पहिल्या टप्प्यातील लाभार्थी शेतकऱ्यांनी शासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे विशेषतः आधार प्रमाणीकरण (KYC) बँक खात्याची पडताळणी आणि Farmer ID पोर्टलवरील “Farmer ID Re-Verify” ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.KYC पूर्ण न झाल्यास किंवा तांत्रिक अडचणी येत असल्यास शेतकऱ्यांनी Farmer ID मध्ये लॉगिन करून “Farmer ID Re-Verify” पर्यायाद्वारे पुन्हा पडताळणी करावी त्यानंतर आधार प्रमाणीकरण पूर्ण करून माहिती सादर केल्यास कर्जमाफीची रक्कम संबंधित खात्यात जमा होण्यास कोणतीही अडचण येणार नाही तसेच,ज्या शेतकऱ्यांचे निधन झाले असून आधार प्रमाणीकरण शक्य होत नाही,अशा प्रकरणांमध्ये सेतू केंद्र चालकांनी Farmer ID पोर्टलवर Unique ID वापरून लॉगिन करावे, “Unable to Authenticate” पर्याय निवडून “Deceased (मयत)” हा पर्याय निवडावा,त्यानंतर स्वतःच्या अंगठ्याच्या प्रमाणीकरणाद्वारे तक्रार नोंदवून त्याची पावती संबंधित सचिवांकडे जमा करावी,अशा सूचनाही शासनाने दिल्या आहेत. सुरेश मुंढे यांनी सांगितले की,पहिल्या टप्प्यात ५,६४७ शेतकऱ्यांना लाभ मिळाला असून उर्वरित पात्र लाभार्थ्यांची यादी टप्प्याटप्प्याने जाहीर केली जाणार आहे. त्यामुळे ज्यांची नावे पहिल्या यादीत नाहीत त्यांनी घाबरून न जाता पुढील याद्यांची प्रतीक्षा करावी तसेच सर्व पात्र शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रे,आधार पडताळणी,KYC व Farmer ID Re-Verify प्रक्रिया वेळेत पूर्ण करून शासनाच्या कर्जमाफी योजनेचा लाभ घ्यावा,असे आवाहन त्यांनी केले पहिल्या टप्प्यातील यादी प्रसिद्ध झाल्याने मालेगाव तालुक्यातील शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण असून,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारच्या या निर्णयामुळे हजारो शेतकरी कुटुंबांना आर्थिक दिलासा मिळणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.
