
अंत्योदय ची साखर दुकानात आहे,पण वाटप नाही !गरीब कार्ड धारकांना मिळणारी साखर वाटप करावी—जाधव यांची मागणी
वाशीम जिल्हा प्रतिनिधी ( अनिल जाधव)
मालेगाव तालुक्यातील १२८ गावातील असलेल्या स्वस्त धान्य दुकानात शासनाच्या वतीने मिळणारी अंत्योदय कार्ड धारकांना मिळणारी साखर उपलब्ध झाली, परंतु वाटप मात्र करण्यात आली नसल्याने पात्र गरीब कार्ड धारकांना,साखर मिळाली नसल्याने परत जावे लागले असल्याने नाराजी व्यक्त केले असल्याचे चित्र पाहायला मिळाले, अंत्योदय कार्ड धारकांना साखर ही दर महिन्याला नियमित वाटप करण्यात आले पाहिजे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अनिल जाधव यांनी केली असून या बाबत मालेगाव तहसील अंतर्गत येणाऱ्या पुरवठा विभागाचे निरीक्षक अधिकारी बळीराम वांजोळ यांना चौकशी केली असता शासना कडून साखर उपलब्ध झाली आहे,(डिलर) दुकानदारींनी साखरेसाठी रक्कम देखील भरलेली आहे,साखर दुकानात नेली सुद्धा परंतु शासनाकडून डाटा उपलब्ध झाला नसल्याने, थम्म घेता येत नसल्याने साखर वाटप नसेल, जुलै महिन्याची वाटपाची शेवटचा दिवस आला, परंतु साखर वाटप नसल्याने कार्ड धारकांना साखर विना वापस जावे लागले, तालुक्यात जवळपास ७०००/-च्या आस पास अंत्योदय कार्ड असुन यांना जुलै महिन्यात साखर दुकानात असूनही मिळाली नसल्याने लोकांन मध्ये नाराजी व्यक्त होत आहे, मार्केट मध्ये तर नुकतेच साखरे चे भाव ५० ते ५५, ग्रामीण भागात तर ६० रूपये प्रती किलो झाले असून, या पात्र रेषन कार्ड धारकांना साखर दर महिन्याला नियमित मिळाली पाहिजे याठी संमधीत पुरवठा वरीष्ठ अधिकारी यांनी लक्ष घालावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अनिल जाधव यांनी केली आहे
