
शहापूर धरण कोरडेच,भूजल पातळी घटल्यामुळे उमरा परिसरात तीव्र पाणीटंचाई शेतकऱ्यांसह ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण
देवानंद खिरकर अकोला जिल्हा प्रतिनिधी
अकोट तालुक्यातील सातपुडाच्या पायथ्याशी वसलेल्या उमरा महसूल मंडळातील बहुतांश क्षेत्र बागायती असल्याने जुलै महिना संपत आला तरी शहापूर धरणात समाधानकारक पाणीसाठा झालेला नाही.धरण अद्याप कोरडेच असल्याने परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.धरणात पुरेसे पाणी नसल्यामुळे परिसरातील अनेक बोअरवेलची पाणीपातळी घटली असून काही ठिकाणी पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे.धरणात अपेक्षित प्रमाणात पाणी साचले नसल्याने शेतीसह पिण्याच्या पाण्यासाठी बोअरवेलवर अवलंबून असलेल्या नागरिकांच्या अडचणी वाढल्या आहेत.सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या शेतांतील बोअरवेलचे पाणी कमी झाल्याने संत्रा,लिंबू, केळी,आणि इतर फळबागांना पाणीपुरवठा करणे कठीण होत आहे.समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे शहरापूर धरण कोडले पडले आहे. *बॉक्स*पाणीटंचाईची शक्यताकाही दिवसांत तुरळक पाऊस झाला असला तरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पर्जन्य न झाल्याने शहापूर धरण अद्यापही कोरडे आहे.येत्या काही दिवसांत दमदार पाऊस न झाल्यास पिण्याच्या पाण्याबरोबरच सिंचनासाठीही गंभीर पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.*चौकट*उपाययोजना राबवाव्यातपरिस्थितीची गांभीर्याने दखल घेऊन शासनाने पाणीसाठा,जलसंधारण आणि पाणी नियोजनासाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने राबवाव्यात अशी मागणी परिसरातील शेतकरी व नागरिकांनी केली आहे. *प्रतिक्रिया*धरणातील पाणीसाठा कमी असून बोअरवेलचे पाणीही झपाट्याने घटत आहे.पुढील काही दिवसांत चांगला पाऊस झाला नाही.तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे.बाळासाहेब बोंद्रे माजी जी.प.सदस्यउमरा सर्कल
