
धावती कार उभ्या वाहनावर धडकल्याने एक जण ठार जसे; अमानी येथील घटना
वाशीम जिल्हा प्रतिनिधी अनिल जाधव
वाशिम ते अकोला महामार्गावरील अमानी येथे दि. २७ जुलै रोजी सकाळी २ वा. च्या सुमारास रोडच्या बाजूला उभ्या असलेल्या केटीसी गाडीवर वर स्विफ्ट डिझायर धडकल्याने एक जण जागीच ठार शिरपूर येथील दीपक लक्ष्मण भांदुर्गे वय ३१वर्ष असे मृतकाचे नाव आहे. महामार्गावरील बेशिस्त पार्किंग दीपक साठी ठरली शेवटची रात्र दोन वर्षाची चिमुकली झाली पोरकी वृद्धापकाळात वडिलांचा आधार हिरावून घेतला आहे. मिळालेल्या प्राप्त माहिती नुसार दिनांक २६ जुलै रोजी मा. पं. स. सदस्य लक्ष्मण भांदुर्गे यांचा मुलगा दीपक भांदुर्गे हा वाशिम येथे त्याच्या मित्राच्या लग्न समारंभासाठी गेला होता तो लग्न समारंभ करुन २७ जुलै रोजी सकाळी २ वाजताच्या सुमारास स्विफ्ट डिझायर गाडी क्रमांक एम एच ३७ व्ही ९८४० या गाडीने वाशिम इथून शिरपूर कडे निघाला होता परंतु अकोला ते वाशिम हायवेवर अमानी जवळ त्याला गाडी चालवत असताना त्याला अचानक डुलकी लागली असावी त्यामुळे गाडीवरचा ताबा सुटून समोर उभ्या असलेल्या केटीसी गाडीवर धडकून त्यामध्ये तो जागीच ठार झाला आहे हा अपघात एवढा भयानक होता की गाडीचा चक्का चूर झाला त्याला गाडीतून ओढून काढावे लागले दीपक भांदुर्गे यांची निधनाची बातमी कळताच शिरपूर गावावर मोठी शोक कळा पसरली आहे. सकाळी 11 वाजता शोकाकुल वातावरणात हजारो लोकांच्या उपस्थित अंत्यसंस्कार करण्यात आले. मृतक दिपक लक्ष्मण भांदुर्गे याला दोन वर्षेची एक मुलगी आहे.सदर घटनेची माहिती अमानी महामार्ग पोलीस केंद्राचे पोलीस psi प्रकाश सरनाईक, सा. pcआंनद काकडे,शरद भोयर, यांनी दिली
