
अ.भा. कैकाडी महासंघाच्या नवनिर्वाचित सर्व पदाधिकाऱ्यांचे सन्मान बीड येथे आयोजित बैठकीला उपस्थित राहावे–उषा जाधव
वाशीम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव)
दि,२७ :- अखिल भारतीय कैकाडी महासंघाचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष डॉ संजय मेडे यांच्या आदेशानुसार २ ऑगस्ट २०२६ रोजी बीड जिल्हयाच्या वतीने महासंघाची महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे या महत्त्वाच्या कार्यक्रमात नुकतेच जाहीर करण्यात आलेल्या अखिल भारतीय कैकाडी महासंघाच्या सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे भव्य दिव्य सत्कार, त्यांना सन्मानित नियुक्ती पत्र वाटप करण्यात येणार आहे, तेंव्हा या या कार्यक्रमाला विदर्भातील तसेच महाराष्ट्रातील कैकाडी समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी ,समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान अखिल भारतीय कैकाडी महासंघाचे नवनिर्वाचित महिला राज्य उपाध्यक्ष सौ उषा अनिल जाधव (अमानी) तथा मा जि प स वाशिम यांनी केले आहे ,तसेच या बैठकीत समाज हिताचे महत्त्वपूर्ण विषय घेण्यात येणार असून जिव्हाळ्याचा व ज्वलंत प्रश्न म्हणजे क्षेत्रीय बंधनाच्या मुद्द्याविषयी पुढील वाटचालीस चर्चा करणे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणिय श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री सन्माननीय श्री. एकनाथजी शिंदे साहेब या दोन्ही नेत्यांच्या उपस्थितीत राज्यव्यापी समाज महामेळावा महासंघाच्या वतीने घेने महत्वाचे आहे. त्या विषयी, महासंघ मजबूत करण्यासाठी, या सर्व बैठकीचे आयोजन केले आहे समाजबांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन उषा जाधव यांच्यासह या मेळाव्यासाठी परभणी जिल्ह्याच्या वतीने सर्व महाराष्ट्रातील महासंघाचे सर्व पदाधिकाऱ्यांनी या मेळाव्यासंबधी बीड येथे २ऑगस्ट २०२६ रोज रविवारी या महत्वाच्या बैठकीसाठी संस्थापक अध्यक्ष संजयजी मेडे, विदर्भाचे प्रमुख नेते किसनराव जाधव, यांच्यासह महाराष्ट्रातील कैकाडी समाजाचे प्रमुख पदाधिकारी यांची उपस्थिती लाभणार आहे, करीता या आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन दिगंबर जाधव राज्य कार्याध्यक्ष तथा पत्रकार यांनी सुद्धा केले आहे
