मिनीबस उलटून भीषण अपघात,दोन जण गंभीर जखमी

मिनीबस उलटून भीषण अपघात,दोन जण गंभीर जखमी

अकोट शहर प्रतिनिधी शिवा मगर

अंजनगाव सुर्जी मार्गावर भंडारज येथील पेट्रोल पंपाजवळ रविवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास शिक्षकांची टुरिस्ट मिनीबस उलटून भीषण अपघात झाला.या दुर्घटनेत दोन शिक्षक गंभीर जखमी झाले असून अनेक जण किरकोळ जखमी झाले आहेत.पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,यूपी ७० ओटी १९२४ क्रमांकाची टुरिस्ट बस वरूड येथील शिक्षक घेऊन शेगाव येथे अधिवेशनासाठी गेली होती.अधिवेशन आटोपून परतीच्या प्रवासात भंडारज येथील पेट्रोल पंपाजवळ ही दुर्घटना घडली.पेट्रोल पंपाजवळ काही दिवसांपूर्वीच गतिरोधक (स्पीड ब्रेकर) बसविण्यात आले आहेत. चालकाच्या पुढ्यात अचानक गतिरोधक आल्याने त्याने जोरात ब्रेक लावला.यावेळी बसवरील नियंत्रण सुटल्याने मिनीबस रस्त्यावर उलटली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *