
अकोला जिल्हा प्रतिनिधी देवानंद खिरकर
१ ऑगस्टपासून अकोटात हेल्मेट सक्ती,नियम तोडणाऱ्यांची आता खैर नाही अकोट उपविभागीय पोलीस अधिकारी निखिल पाटील यांचा इशारा
अकोला जिल्हा प्रतिनिधी देवानंद खिरकर
अकोट तालुक्यात वाढत्या अपघातांना आळा घालण्यासाठी १ ऑगस्ट २०२६ पासून दुचाकीस्वारांना हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे.नियम केवळ कागदावर न राहता त्याची कठोर अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस विभागाकडून शहरासह ग्रामीण भागात विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.हेल्मेटशिवाय वाहन चालविणाऱ्यांवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई केली जाणार असून,वाहतूक नियम मोडणाऱ्यांना आता कोणतीही सवलत मिळणार नाही.अकोट उपविभागीय पोलीस अधिकारी निखिल पाटील यांनी नागरिकांना वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले मागे आहे.दुचाकीस्वारासह बसणाऱ्या व्यक्तीनेही दर्जेदार हेल्मेट वापरणे आवश्यक आहे.हेल्मेट हे पोलिसांचा दंड टाळण्यासाठी नव्हे,तर अपघातात जीव वाचविण्यासाठीचे सुरक्षा कवच असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.शहर व ग्रामीण भागातील विविध चौकांमध्ये तपासणी नाके उभारून हेल्मेट,ट्रिपल सीट,अतिवेग,मोबाईलवर बोलत वाहन चालविणे यासह अन्य नियमभंगावर कारवाई केली जाणार आहे.पालकांनी अल्पवयीन मुलांच्या हातात वाहने देऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे.हेल्मेट दंडापासून बचावासाठी नाही तर जीव वाचविण्यासाठी आहे.प्रत्येकाने नियम पाळून स्वतःसह इतरांचा जीव सुरक्षित ठेवावा असा स्पष्ट संदेश उपविभागीय पोलीस अधिकारी निखिल पाटील यांनी दिला आहे.
